MI vs DC: 'करो या मरो' सामन्यात दिल्लीचा कर्णधार बाहेर..! कारण काय?
आयपीएल 2025च्या 63व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने आहेत. (Mumbai Indians vs Delhi Capitals) दोन्ही संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ आहे. जर दिल्ली आज हरली तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. पण दिल्लीसाठी निराशाजनक गोष्ट म्हणजे कर्णधार अक्षर पटेल (Axar Patel) या महत्त्वाच्या सामन्यात खेळत नाही. त्याच्या जागी फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) संघाची धुरा सांभाळत आहे.
जेव्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध अक्षर पटेलच्या जागी फाफ डू प्लेसिस टॉस करायला आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल इतक्या महत्त्वाच्या सामन्यात का खेळत नाही? चला तर मग यामागील कारण जाणून घेऊया.
नाणेफेकीनंतर फाफ डू प्लेसिस म्हणाला, “गेल्या 2 दिवसांपासून अक्षर पटेल खूप आजारी आहे हे त्याच्यासाठी दुर्दैवी आहे. त्याला फ्लू आहे, म्हणून आम्ही त्याला शुभेच्छा देतो. त्याने या हंगामात आमच्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि आज आम्हाला त्याची उणीव भासेल. अक्षर पटेल आज खेळत नाही. अक्षर दोन खेळाडूंच्या बरोबरीचा आहे आणि त्याची जागा घेणे कठीण आहे.”
मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन-
फाफ डु प्लेसिस (कर्नाधार), अभिषेक पोरेल (यशिरक्षक), समीर रिजवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टॅब्स, दुश्मण्था चामेरा, विप्रज निगम, माधव तिवारी, कुल्दीप यादव, कुल्दीप यादव कुल्डीप यादव कुल्डीप याडव
Comments are closed.