Axiom Mission 4 – शुभांशू शुक्लाची अंतराळ मोहीम पुन्हा पुढे ढकलली; लवकरच पुढील तारीख जाहीर होणार

अॅक्सिओम मिशन 4 च्या बहुप्रतिक्षित प्रक्षेपणासाठी जोरदार सराव सुरू आहे. या मोहिमेद्वारे हिदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात जाणार आहे. ही मोहीम रविवारी 22 जून रोजी नियोजित होती. मात्र, आता ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. याआधीही ही मोहिम तांत्रिक त्रुटीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्ही ही पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
अलिकडच्या दुरुस्तीच्या कामानंतर अंतराळ संस्था आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कामकाजाचे मूल्यांकन करत असल्याने मोहिम पुढे ढकलण्यात आली आहे. आता सातव्यांदा ही मोहिम पुढे ढकलली आहे. पेगी व्हिटसन अॅक्सिओम-4 मोहिमेचे नेतृत्व करतील, तर शुभांशू शुक्ल पायलट म्हणून काम करतील. अॅक्सिओम मिशन 4 च्या प्रक्षेपण तयारीचा आढाव घेण्यात येत आहे. नासाकडून रविवारी 22 जून रोजी होणारे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत प्रक्षेपणाची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाने एका निवेदनात म्हटले आहे.
सद्यस्थितीत 30 जूनपर्यंत उड्डाणाची वेळ आहे. मात्र, काही कारणास्तव ही मुदत हुकली तर, जुलैच्या मध्यात आणखी एक संधी उपलब्ध होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अॅक्सिओम मिशन 4 हे स्पेसएक्स आणि नासा यांच्या भागीदारीत अॅक्सिओम स्पेसद्वारे चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी नियोजित खाजगी अंतराळ उड्डाण आहे. नासाचे माजी अंतराळवीर आणि अॅक्सिओम स्पेसमधील मानवी अंतराळ उड्डाण संचालक पेगी व्हिटसन या मोहिमेचे नेतृत्व करतील. इस्रोचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला पायलट म्हणून काम करतील. 1984 मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांनी इतिहास रचल्यानंतर जवळजवळ चार दशकांनी अंतराळात जाणारे दुसरे भारतीय बनतील.
Comments are closed.