आयुष म्हात्रेने शतकी खेळी करत रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; केली ऐतिहासिक कमाल!
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये, 18 वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रेने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केले. मुंबईकडून खेळताना, त्याने विदर्भाविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने विरोधी गोलंदाजांना धो धो धुतलं. त्याने संघासाठी डावाची सुरुवात केली आणि सुरुवातीपासूनच तो स्फोटक खेळला. विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या. आयुषच्या कामगिरीमुळे मुंबईने लक्ष्य सहज गाठले.
विदर्भाविरुद्धच्या सामन्यात, आयुष म्हात्रेने 53 चेंडूत एकूण 110 धावा केल्या, ज्यामध्ये 8 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. विदर्भाच्या गोलंदाजांना त्याने पूर्णपणे फ्लाॅप ठरवले. आयुष प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी20 या तिन्ही स्वरूपात शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडला आहे. आयुष सध्या 18 वर्षे 135 दिवसांचा आहे आणि त्याने प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी20 या तिन्ही स्वरूपात शतके केली आहेत. रोहितने तिन्ही स्वरूपात शतके केली तेव्हा त्याचे वय 19 वर्षे 339 दिवस होते.
प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी20 मध्ये शतके करणारा सर्वात तरुण फलंदाज
आयुष म्हात्रे 18 वर्षे 135 दिवस
रोहित शर्मा ३३९ दिवस १९ वर्ष
उन्मुक्त चंद २० वर्षे ० दिवस
क्विंटन डी कॉक 20 वर्षे 62 दिवस
अहमद शहजाद 20 वर्षे 97 दिवस
आयुष म्हात्रेने आतापर्यंत 13 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 660 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतके आहेत. त्याने सात लिस्ट ए सामन्यांमध्ये 458 धावा देखील केल्या आहेत. आयुषने लिस्ट ए क्रिकेटमध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये एका शतकासह 368 धावा केल्या आहेत.
आयुष म्हात्रे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो त्याने आयपीएल 2025 मध्ये सर्वांना प्रभावित केले. त्याने सीएसकेसाठी सात सामन्यांमध्ये एकूण 240 धावा केल्या आहेत.
Comments are closed.