बी. सुदर्शन रेड्डी फायली नामांकन

उपराष्ट्रपती निवडणूक :  सी. पी. राधाकृष्णन यांच्याविरुद्ध लढणार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

‘इंडिया’ आघाडीकडून जाहीर करण्यात आलेले उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अलिकडेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे नाव जाहीर केले होते. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नामांकनाचा आज शेवटचा दिवस होता. विरोधी आघाडीच्या नामांकनामुळे आता सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध बी. सुदर्शन रेड्डी अशी थेट लढत होणार आहे. रालोआचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी अर्ज दाखल केला होता. बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नामांकनादरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते. नामांकन दाखल केल्यानंतर त्यांनी संविधानात नमूद केलेल्या मूल्यांप्रती खोल नम्रता आणि अढळ वचनबद्धतेने नामांकन दाखल केल्याचे स्पष्ट केले. माझे जीवन लोकशाही परंपरांमध्ये रुजलेले असून भारताची खरी ताकद प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed.