ऑगस्ट महिन्यात होणार प्रचंड अग्निवर्षाव; बाबा वेंगाच्या भाकीताची जगभरात चर्चा

2025 हे वर्ष म्हणजे जगाच्या अंताची सुरुवात असेल, असे धक्कादायक भाकीत बाबा वेंगा यांनी केले आहे. तसेच जुलै महिन्यात जपानमध्ये मोठी त्सुनामी येण्याचे त्यांचे भाकीत खरे ठरले आहे. त्यामुळे ऑगस्ट 2025 बाबत त्यांनी केलेल्या भाकीताची जगभरात चर्चा होत आहे. बल्गेरियातील बाबा वेंगा रहस्यमय भाकितेसाठी ओळखल्या जातात. त्यांना ‘बाल्कनचे नोस्ट्रेडॅमस’ असेही म्हणतात. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांनी केलेली अनेक भाकीते सत्य ठरली आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली भाकिते नेहमी चर्चेत असतात. 2025 च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी दुहेरी आग म्हणजेच अग्निवर्षाव याबाबत भाकीत केले आहे. सध्या त्याची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.

लिथुआनियन न्यूज वेबसाइट मेड इन विल्निअसनुसार, बाबा वेंगा यांनी ऑगस्ट 2025 मध्ये जगाला दुहेरी आगीचा सामाना करावा लागेल. याबाबत त्यांना डबल फायर असा शब्द वापरला आहे. आता डबल फायर याचा नेमका अर्थ काय यावरही चर्चा होत आहे. याचा अर्थ काय हे अजूनही एक गूढ आहे. मात्र, दुहेरी आग म्हणजे जगात वाढणारी युद्धजन्य परिस्थिती किंवा जंगलातील वणवे असा अर्थ काहीजण लावत आहेत. तर काहीजणांनी ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरी आग म्हणजे उल्कापिंड किंवा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बाबा वेंगीच्या दुसऱ्या भाकितेमध्ये असेही म्हटले होते की, मानव उत्सुकतेपोटी घातक ज्ञानाच्या जवळ जाईल. एकदा उघडलेले हात पुन्हा बंद करता येत नाही, असे गूढ भाकीत करण्यात आले आहे. याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होत आहे. अनेकजण याचा संबंध जैवतंत्रज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेशी (एआय) लावकत आहेत. हे ज्ञान जगाला घातक ठरण्याचे भाकीत त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे 2025 मध्ये जगात नैसर्गिक आपत्ती वाढण्याचे भाकीतही त्यांनी केले आहे. त्यामुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या वर्षात मानावाचा एलियन्सशी संपर्क होण्याचे भाकीतही त्यांनी केले आहे.

Comments are closed.