बाबर आझमच्या नावावर लाजिरवाणा रेकाॅर्ड, 719 दिवसांनी वनडेमध्ये घडली 'ही' गोष्ट…!

बाबर आझम: पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार बाबर आझमचे वाईट दिवस संपण्याचे नाव घेत नाहीत. आधी त्याला टी20 संघातून बाहेर काढण्यात आले, तर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी वनडे संघात त्याचे पुनरागमन झाले असले तरी, पहिल्या 2 सामन्यांमध्ये त्याची कामगिरी खराब राहिली आहे. बाबर आझम पहिल्या वनडेमध्ये 47 धावा काढण्यात यशस्वी झाला होता, पण दुसऱ्या सामन्यात तो खाते न उघडताच तंबूत परतला. त्यामुळे आता संघात त्याच्या स्थानाला धोका निर्माण झाला आहे. (Babar Azam poor form)

बाबर आझम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागील 63 डावांमध्ये शतक झळकावू शकलेला नाही. (Babar Azam century drought) बाबरने आपले शेवटचे शतक 2023 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये नेपाळविरुद्धच्या सामन्यात केले होते. त्यानंतर तो तिन्ही फॉरमॅटमध्ये एकदाही 100 धावांचा आकडा गाठू शकला नाही. वनडेमध्ये बाबर आझम पाचव्यांदा शून्यावर बाद झाला आहे. (Babar Azam duck) यापूर्वी तो ऑगस्ट 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शून्य धावांवर तंबूत परतला होता. अशा प्रकारे, तब्बल 719 दिवसांनंतर तो वनडेमध्ये खाते न उघडताच तंबूत परतला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विंडीजचा वेगवान गोलंदाज जायडन सील्सने त्याला बोल्ड केले.

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग-11 मध्ये बदल पाहायला मिळाले. पाकिस्तानने नसीम शाह, फहीम अश्रफ आणि सूफियान मुकीम यांच्या जागी मोहम्मद नवाज, हसन अली आणि अबरार अहमद यांना संधी दिली, तर यजमान वेस्ट इंडिजने रोमारियो शेफर्डच्या जागी जस्टिन ग्रीव्सला स्थान दिले. दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने टाॅस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यात त्यांनी पाकिस्तानच्या 37 धावांच्या स्कोरपर्यंत 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. (Pakistan vs West Indies ODI series)

Comments are closed.