फॉर्म नसतानाही पाकिस्तानच्या बाबर आझम वर्ल्ड रेकॉर्डच्या शिखरावर, थेट रोहित शर्माला टाकले मागे
बाबर आझमने रोहित शर्माचा विक्रम मोडला. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Pakistan vs South Africa, 2nd T20I) टी20 मालिकेत फारशी चमक दाखवू शकलेला नाही, पण फॉर्म नसतानाही त्याने जागतिक क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात त्याने केवळ 11 धावा केल्या, पण त्या छोट्याशा खेळीमुळेच तो टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी हा वर्ल्ड रेकॉर्ड भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता.
रोहितला मागे टाकलं, विराट तिसऱ्या क्रमांकावर (Babar Azam Breaks Rohit Sharma Record)
बाबर आझमने रोहित शर्माला मागे टाकत टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. या यादीत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली देखील त्यांच्या जवळच आहे. मात्र, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही बाबरला मागे टाकू शकणार नाहीत, कारण या दोन्ही खेळाडूंनी 2024 मध्ये टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
आज रात्री लाहोरमध्ये बाबर आझमसाठी एक खास मैलाचा दगड 🙌 pic.twitter.com/CyKvS4dg6T
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) ३१ ऑक्टोबर २०२५
फॉर्म नसतानाही पाकिस्तानच्या बाबर आझम वर्ल्ड रेकॉर्डच्या शिखरावर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत चाहत्यांना बाबरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण दुसऱ्या टी20 मध्ये पाकिस्तानसमोर केवळ 111 धावांचं छोटं लक्ष्य होतं, आणि बाबर फलंदाजीला आला तेव्हा सामना जवळपास संपलाच होता. तरीही खराब फॉर्मच्या काळात असा विक्रम करणे हे दाखवून देते की बाबर किती सातत्याने खेळतो आणि गेल्या काही वर्षांतील त्याच्या फलंदाजीचा दर्जा किती उंच आहे. बाबरने आत्तापर्यंत 130 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 123 डावांत 4234 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माच्या नावावर 159 सामन्यांत 4231 धावा आहेत.
विक्रमचे महत्त्व
सध्या फॉर्म थोडा ढासळलेला असला, तरी टी20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनणं ही मोठी कामगिरी आहे. हा विक्रम बाबरच्या सातत्याचं आणि गेल्या दशकभरातील त्याच्या प्रभावी कामगिरीचं प्रतीक आहे. आता चाहत्यांना अपेक्षा आहे की तो हा विक्रम पुढे आणखी भक्कम बनवेल आणि आगामी टी20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या बॅटने पुन्हा एकदा गाजवेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.