पाकिस्तान क्रिकेट संघात मोठी उलथापालथ; बाबर आझम, आफ्रिदी, रिझवानला संघातून डच्चू, कोण बनला कर्ण

बांगलादेश टी -२० साठी पाकिस्तान पथक: पुढील मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान व्यतिरिक्त शाहीन शाह आफ्रिदीला या संघातून डच्चू मिळाला आहे. पाकिस्तानी संघ या महिन्यात बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळण्याची तयारी करत आहे. यासाठी सलमान अली आगा यांना पुन्हा एकदा कर्णधार बनवण्यात आले आहे. एकीकडे तीन मोठ्या खेळाडूंना वगळण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना, पीसीबी निवड समिती काय विचार करते हे देखील पाहणे बाकी आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. पूर्वी ही मालिका पाच सामन्यांची असणार होती, पण आता ती फक्त तीन सामन्यांची करण्यात आली आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानच्या 16 खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

पण, त्यात बाबर, शाहीन आणि रिझवान यांची नावे नाहीत. मालिकेतील सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. एकेकाळी मालिका अनिश्चित होती, परंतु पीसीबी आणि बीसीबी यांच्यातील बैठकीनंतर तीन सामन्यांच्या मालिकेला हिरवा कंदील देण्यात आला.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील ही मालिका आधी 25 मे पासून सुरू होणार होती, परंतु आता ती पुढे ढकलण्यात आली आहे, नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. पीएसएल काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले होते, त्यामुळे ते पुन्हा वेळापत्रकात बदल करावे लागले. या मालिकेसाठी सलमान अली आगा यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर शादाब खान उपकर्णधारपदाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ

सलमान अली आगा (कर्नाधर), शादाब खान, अब्रार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हरीस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तालत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस, मोहम्मद वासिम, इरफान खान, मोहम्मद वासिम

हे ही वाचा –

IND Squad vs ENG Tour : 7 फलंदाज, 2 विकेटकीपर, 3 ऑलराउंडर, इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची 18 खेळाडूंची फौज, निवडीचा दिवस ठरला!

Mumbai Rain MI vs DC IPL 2025 : पावसामुळे मुंबई इंडियन्सचा गेम बिघडणार? दिल्लीविरुद्ध सामना रद्द झाला तर कोण जाणार टॉप 4 मध्ये? समजून घ्या गणित

अधिक पाहा..

Comments are closed.