विश्वविक्रम करण्यापासून हुकला बाबर आझम! केवळ 10 धावा राहिला दूर

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) संघातील तिरंगी मालिकेचा सामना कराचीमध्ये खेळला जात आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरोच्या परिस्थितीपेक्षा कमी नाही कारण जो संघ हा सामना जिंकेल तो शुक्रवार (11 फेब्रुवारी) रोजी न्यूझीलंडविरुद्ध या तिरंगी मालिकेचा फायनल सामना खेळेल. तत्पूर्वी या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) या सामन्यात विश्वविक्रम करण्यापासून हुकला.

खरे तर, या सामन्यापूर्वी, बाबर आझमला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद 6,000 धावा पूर्ण करण्यासाठी 33 धावा कराव्या लागल्या. या सामन्यात बाबरने वेगवान सुरुवात केली. तथापि, त्याने 19 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. अशाप्रकारे, तो इतिहास रचण्यापासून चुकला. जर बाबरने या सामन्यात 33 धावा केल्या असत्या तर तो वनडे सामन्यात सर्वात जलद 6,000 धावा करणारा फलंदाज ठरला असता.

बाबर आझमने 125 वनडे सामन्यांच्या 122 डावात फलंदाजी करताना 55.98च्या सरासरीने 5,990 धावा केल्या आहेत. बाबरने वनडे सामन्यांमध्ये 34 अर्धशतकांसह 19 शतके झळकावली आहेत. आता बाबर हा विश्वविक्रम आपल्या नावावर करू शकणार नाही. पण त्याला अजूनही या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

वनडे सामन्यात सर्वात जलद 6,,000 धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमलाच्या (Hashim Amla) नावावर आहे. अमलाने 123 डावांमध्ये ही कामगिरी केली. आता पुढच्या सामन्यात बाबरने 10 धावा केल्या तरी तो फक्त आमलाच्या विक्रमाची बरोबरी करू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL मधून बाहेर पडणार संजू सॅमसन? दुखापतीबद्दल अपडेट समोर
IND vs ENG: टीम इंडियाचा दणदणीत विजय, इंग्लंडचा व्हाईट वाॅश, गिल-विराट चमकले
विराट कोहलीची मोठी कमाल! अर्धशतक झळकावून सचिनचे 2 विक्रम मोडले

Comments are closed.