वनडे मालिकेपूर्वीच बाबर आजमची निराशाजनक कामगिरी! सरावादरम्यान नेट गोलंदाजाकडून बाद

पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. पहिल्यांदा 5 टी20 आणि त्याच्यानंतर 29 मार्चपासून त्यांना तीन वनडे इंटरनॅशनल सामन्यांची मालिका खेळायची आहे. यादरम्यान बाबर आजम पुन्हा एकदा टीकाकारांच्या निशाणावर आहे. कारण सरावासत्रा दरम्यान तो एका नेट गोलंदाजाकडून बाद झाला. बाबर आजम सरावा दरम्यान ऑफ स्पिन गोलंदाजाविरुद्ध लेग साइडवर शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान अंपायरने त्याला एलबीडब्ल्यू बाद घोषित केले.

बाबर आजम सुद्धा अंपायरच्या या निर्णयाने आश्चर्यचकित झाला. तो बाद झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. मागच्या काही महिन्यांपासून बाबर आजमचे तीनही फॉरमॅटमध्ये आकडे काही चांगले नाहीत. 2025 वर्षांमध्ये त्याने आत्तापर्यंत 6 वनडे सामन्यांमध्ये फक्त 149 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये केवळ एक अर्धशतक सामील आहे. त्याने या वर्षात 6 कसोटी डावांमध्ये फक्त 184 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी फक्त 30.67 इतकी आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2026 टी20 वर्ल्डकपसाठी काही योजना बनवून न्युझीलंड दौऱ्यावर एक नवा टी20 संघ पाठवला आहे. ही टी20 मालिका आत्ता चालू आहे. त्यामधली खास गोष्ट ही आहे की, पाकिस्तानचे नेतृत्व सलमान आगाकडे सोपवण्यात आले आहे. मोहम्मद रिजवान आणि बाबर आजम यांसारख्या अनुभवी खेळाडू यांना टी20 संघामधून बाहेर करण्यात आले आहे आणि हा खूप आश्चर्य चकित निर्णय आहे.

आता 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकिस्तान 1-2 पिछाडीवर आहे. पहिल्या दोन सामन्यात यजमान न्युझीलंड संघ विजयी होता. तसेच तिसऱ्या सामन्यात हसन नवाजच्या शानदार 105 धावांच्या शतकी पारीमुळे पाकिस्तान संघाने मोठा विजय प्राप्त केला. वनडे मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तान न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना 29 मार्च रोजी नेपियर मध्ये होणार आहे. तसेच दुसरा सामना 2 एप्रिल आणि तिसरा सामना 5 एप्रिल रोजी खेळला जाणार आहे.

Comments are closed.