बाबर आझमचा IPL पगार अनकॅप्ड खेळाडूपेक्षा कमी! तरीही खेळायला तयार
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या बिग बॅश लीग 2025-26 ची सुरुवात 14 डिसेंबरपासून होणार आहे आणि या लीगचा अंतिम सामना 25 जानेवारीला खेळवला जाणार आहे. बिग बॅश लीगमध्ये पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम देखील खेळणार आहे. या लीगच्या सुरूवातीपूर्वी प्लेअर ड्राफ्ट होतो, पण प्री-सायनिंग ड्राफ्टअंतर्गत सिडनी सिक्सर्सने बाबर आझमला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. मात्र या लीगमध्ये प्लॅटिनम कॅटेगरीत गेल्यानंतरही बाबर आझमला आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूपेक्षा कमी पगार मिळणार आहे.
बीबीएलमध्ये खेळाडूंना चार कॅटेगरीमध्ये विभागले जाते आणि त्यानुसारच त्यांचा पगार ठरतो. प्लॅटिनम कॅटेगरीत येणाऱ्या खेळाडूंना सर्वाधिक पगार मिळतो, तर ब्रॉन्झ कॅटेगरीतील खेळाडूंना सर्वात कमी पगार मिळतो.
बीबीएलमध्ये बाबर आझमला प्लॅटिनम कॅटेगरीत साइन करण्यात आले आहे. त्यामुळे या पाकिस्तानी खेळाडूला ही लीग खेळण्यासाठी 4,20,000 यूएस डॉलर्सपर्यंत रक्कम मिळू शकते. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 3.68 कोटी रुपये इतकी होते.
आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सचा ओपनिंग फलंदाज प्रियांश आर्याने तुफानी फलंदाजी केली. प्रीती झिंटाच्या पंजाब टीमने या खेळाडूला 3.80 कोटी रुपये देऊन खरेदी केले होते, जे बीबीएलमधील प्लॅटिनम कॅटेगरीतील खेळाडूंना मिळणाऱ्या पगारापेक्षाही जास्त आहे. अजूनपर्यंत प्रियांश आर्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही.
Comments are closed.