पाकिस्तान संघातून बाबर-रिजवानला का वगळलं? PCB अध्यक्षांनी अखेर सोडलं मौन

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी पाकिस्तानने आपला संघ काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. सलमान अली आघाच्या कर्णधारपदाखाली ही टीम मोठ्या स्पर्धेत उतरायला सज्ज आहे. मात्र, पाकिस्तानचे स्टार खेळाडू बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिजवान (Mohmmed Rizwan) यांना या संघात स्थान मिळालं नाही. यामुळे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावर निवड समितीवर जोरदार टीका झाली. अखेर आता PCB अध्यक्षांनी या विषयावर मौन तोडलं आहे.

मोहम्मद रिजवान आणि बाबर आझमकडे मोठा अनुभव आहे. गेल्या काही काळात त्यांचा खेळ विशेष ठळक दिसला नसला तरी त्यांच्या अनुभवाचा पाकिस्तानला मोठा फायदा होऊ शकला असता. आशिया कपसाठी (Asia Cup) झालेल्या निवडीवर प्रश्न विचारला असता PCB अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी सांगितले की, या निर्णयासाठी ते स्वतः जबाबदार नाहीत. त्यांनी यासाठी निवड समिती आणि सल्लागारांवर जबाबदारी टाकली.

आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Comments are closed.