संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच


Bacchu Kadu on Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदारीची पद्धत बंद करण्यात आली. या वतनदारीतून गुलामशाही, निजामशाही आणि आदिलशाही चालायची. ही वतनदारी बंद केल्यानेच संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj)  हे त्यांच्या सासऱ्यांकडून मारले गेले. पण नाव औरंगजेबाचे बदनाम झाले. राजा असा पाहिजे. तो मरण पत्कारायला तयार झाला पण त्याने सासऱ्याला वतन दिले नाही, असे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी रविवारी बुलढाण्यातील पातुर्डा गावातील शेतकरी हक्क परिषदेत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीवरुन राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली.  शरद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं, मलाही पाडाल, असे बच्चू कडू यांनी म्हटले. शेतकरी हे जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाही, नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल. गाव आणि शेतकरी गरीब राहिला तरच शहरं श्रीमंत होतील. सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं.तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते. शेतकऱ्याला आपण जर विचारलं तर तू काय करतो तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात. मोर्चे, मेळावे, प्रचाराला गर्दी असते, मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते. बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी तुमच्यासाठी काही कमी केलं का? अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले. शरद जोशींना शेतकऱ्यांनी पाडलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पाडलं, मलाही शेतकऱ्यांनीच पाडलं. कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असंच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले

Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांची बच्चू कडूंवर टीका

शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावे, या बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी टीकास्त्र सोडले. आमदाराला कापण्याचं काम बच्चू कडू यांनीच करावे. त्यांना शेतकऱ्यांवर आणखी गुन्हे दाखल करायचे आहेत का? त्याऐवजी त्यांनी स्वत:च हे काम करावे. एखादे वक्तव्य करताना बच्चू कडू यांनी भान ठेवले पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

आणखी वाचा

उपोषणकर्ता आपल्या दारी! संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न, आंदोलकालाच घरी बोलवून ज्यूस पाजला

आणखी वाचा

Comments are closed.