संजू सॅमसनच्या चाहत्यांसाठी धक्का, टीममधून बाहेर होण्याची शक्यता!

आयपीएल 2025 (IPL 2025 Rajasthan royals) मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ खूप अपयशी ठरला. आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली. फ्रँचायझी पॉइंट्स टेबलवर 9व्या स्थानावर होती. फक्त रन रेट चांगला असल्यामुळे ती चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai super kings) पुढे राहू शकली. या अपमानास्पद कामगिरीनंतर राजस्थान रॉयल्समध्ये मोठे बदल होत आहेत. आता संजू सॅमसन (Sanju Samson) देखील आयपीएल 2026च्या ऑक्शनपूर्वी फ्रँचायझी सोडू शकतो. यामुळे ही बाब भारतीय विकेटकीपरच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का असू शकतो.

टी20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी उत्तम कामगिरी केल्यानंतरही संजू सॅमसनची सलामी फलंदाजांची जागा गेली आहे. आता तो टी20 संघात नंबर 5 वर फलंदाजी करत आहे, जिथे त्याला खूप वेळ फलंदाजी करण्याची संधी मिळत नाही.

आता चाहत्यांसाठी आणखी वाईट बाब समोर येत आहे. रिपोर्टनुसार आयपीएल 2026च्या लिलावापूर्वी सॅमसनला राजस्थान रॉयल्स सोडवू शकते. रिलीज करण्याआधी त्याला ट्रेड करण्याचीही चर्चा आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल 2026 मध्ये सॅमसन कोणत्या तरी नव्या टीमसह खेळताना दिसू शकतो. सध्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघाची त्याच्यावर नजर आहे.

Comments are closed.