बदलापुरमधील महिला काँग्रेस नेत्याला संपवलं; सर्पदंश, ब्रेन हॅमरेज, नंतर हत्या, नवऱ्यानेच घरात

बदलापूर: बदलापूरमध्ये तीन वर्षांपूर्वी काँग्रेसपक्षाच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर (Congress Leader Neerja Ambekar Murder Case) यांचा मृत्यू प्रकरणामध्ये एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. त्यांचा झालेला मृत्यू (Congress Leader Neerja Ambekar Murder Case) नैसर्गिक नसून ती पुर्वनियोजित हत्या होती, असा खुलासा समोर आला आहे. एका दुसऱ्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीने दिलेल्या माहितीमुळे हा नीरजा आंबेकर यांच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नीरजा (Congress Leader Neerja Ambekar Murder Case) यांचा पती रुपेश आंबेकर आणि त्याच्या तीन साथीदारांना देखील अटक केली आहे. हत्येनंतर नीरजा यांच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या कुळगांव-बदलापूर सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचीही आता चौकशी केली जाणार आहे.(Congress Leader Neerja Ambekar Murder Case)

Badlapur Neerja Ambekar Murder : प्रकरण नेमकं कसं आलं उघडकीस?

काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक राजेश गज्जल हे या प्रकरणाचा तपास करत असताना, चौकशीदरम्यान त्यांनी ऋषिकेशला ‘तू आणखी काय-काय केलं आहेस?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा ऋषिकेशनं बोलता बोलता तीन वर्षांपूर्वीच्या एका हत्येचा खुलासा केला, त्यावेळी पोलीस चक्रावले.

Badlapur Neerja Ambekar Murder : हत्येचा कट व्यावसायिक रुपेश आंबेकरने रचला

पोलिस चौकशीदरम्यान ऋषिकेशने सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2022 मध्ये काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा जो मृत्यू झाला, तो आकस्मिक नसून त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येचा कट नीरजा यांचा पती आणि व्यावसायिक रुपेश आंबेकर याने रचला. त्यावेळी पोलिसांनी या मृत्यूची एडीआर दाखल केली होती, परंतु तपासात कोणताही सुगावा किंवा संशयित आरोपी न मिळाल्यानं हे प्रकरण तिथंच थांबलं होतं.

Badlapur Neerja Ambekar Murder :हत्येमध्ये सर्पदंशाचा वापर

ऋषिकेशने पोलिसांच्या समोर दिलेल्या कबुलीनुसार, नीरजा यांचा पती रुपेश आंबेकर याने तीन साथीदारांच्या मदतीने त्यांची हत्या केली होती. या हत्येमध्ये सर्पदंशाचा वापर करण्यात आला होता. 2022 मध्ये रुपेश, चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या चौघांनी मिळून हा कट रचला होता. हत्येच्या आधी रुपेशने घराच्या किचनमध्ये एका गोणीत साप आणून ठेवला होता. त्यानंतर हत्या करण्याच्या रात्री, नीरजा यांच्या पायाची मालिश करण्याच्या बहाणाने त्यांना हॉलमध्ये पालथं झोपवण्यात आलं होतं. याचवेळी चेतन दुधाने (सर्पमित्र) याने किचनमध्ये ठेवलेला साप स्टीकच्या मदतीने बाहेर काढला आणि ऋषिकेश चाळकेच्या हातात दिला. नीरजा हॉलमध्ये झोपलेल्या असताना आणि त्यांच्या पाठीवर रुपेश आंबेकर बसलेला असताना, ऋषिकेश चाळके याने नीरजा यांच्या डाव्या घोट्याजवळ त्या सापाकडून तीन वेळा दंश करवून घेतला होता.

आणखी वाचा

Comments are closed.