बदलापुरात चोरट्यांनी धुमाकूळ, एका रात्रीतच चोरट्यांनी सात दुकानं फोडली, लाखोंचा मुद्देमाल पसार
बदलापूर क्राईम न्यूज: बदलापुरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे. एका रात्रीतच चोरट्यांनी सात दुकान फोडली आहेत. यामध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल पसार केला आहे. या घटनेमुळं बदलापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. बदलापूर पश्चिमेकडील सानेवाडी परिसरात चोरीचा हा प्रकार घडला आहे.
बदलापुरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून काल रात्री चोरट्यांनी एकाच ठिकाणची सात दुकानं फोडली आहेत. बदलापूर पश्चिमेकडील सानेवाडी परिसरात चोरीचा हा प्रकार घडलाय. ही दुकानं फोडून चोरट्यानी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. बदलापुरात सलग दुसऱ्या दिवशी दुकान फोडीच्या घटना घडल्या आहेत. काल रात्री बदलापूर पश्चिमेकडील सानेवाडी परिसरात चोरट्यांनी सात दुकानांचे शटर फोडून चोरी केली. या चोरट्यांनी किराणा दुकानं तसंच कपड्यांची दुकानं फोडून दुकानातील रोख रक्कम लंपास केली आहे. पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास ही चोरी झाल्याचं दुकानदारांनी सांगितलय. या वाढत्या चोऱ्यांमुळे बदलापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune Crime News: पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी; दुधवाल्यानेच मारला डल्ला, डिजीटल लॉकचा पासवर्ड सापडला अन्…
आणखी वाचा
Comments are closed.