मोठी बातमी : दहशतवाद्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देणाऱ्या डॉक्टरला बदलापूरमधून अटक

बदलापूरमध्ये राहून दहशतवाद्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देणाऱ्या एका डॉक्टरला उत्तर प्रदेशच्या दहशतवादी पथकाने अटक केली आहे. ओसामा शेख असे त्या डॉक्टरचे नाव असून त्याला सोमवारी उल्हासनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासासाठी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी ओसामा शेख याचा ताबा घेतला असून त्याला उत्तर प्रदेशला नेल्याचे समजते. या प्रकारानंतर बदलापूर शहरात खळबळ उडाली आहे.

सोमवारी बदलापूर शहरात उत्तर प्रदेश राज्यातील दहशतवादी विरोधी पथकाने धडक दिली. यावेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बदलापूर पूर्व येथील एका खासगी रुग्णालयात काम करणारा 25 वर्षीय डॉ. ओसामा शेख याला अटक केली. या कारवाईत परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या मदतीने दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

उत्तर प्रदेशातील एका दहशतवादी प्रकरणातील आरोपींना त्याने ऑनलाईन मार्गदर्शन केले होते, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस उपअधिक्षक सुशील सिंग यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ओसामाला अटक केली.

Comments are closed.