बहारीन-हैदराबाद विमान धोक्यामुळे मुंबईत उतरले

सर्कल संस्था/हैदराबाद

हैदराबाद विमानतळावर रविवारी पहाटे बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या. विमानतळाच्या ग्राहक समर्थन आयडीवर पहाटे 3 वाजता एक ईमेल आला. त्यामध्ये बहरीनहून हैदराबादला येणाऱ्या गल्फ एअर फ्लाइट जीएफ-274 मध्ये बॉम्ब असल्याचे म्हटले होते. या अलर्टनंतर सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विमान त्वरित मुंबईकडे वळवून तातडीने उतरविण्यात आले. तपासणीअंती बॉम्बची धमकी खोटी असल्याचे सिद्ध झाले. आता पोलीस यंत्रणा धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. याप्रसंगी विमानात 154 प्रवासी होते. सर्व सुरक्षा तपासणी पूर्ण केल्यानंतर विमान सकाळी 11:31 वाजता हैदराबाद विमानतळावर पोहोचले. यापूर्वी शनिवारीही हैदराबाद विमानतळावर बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली होती. सलग दोन दिवस आलेल्या या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली असून हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

Comments are closed.