बीएमडब्ल्यू कार अपघातात आरोपींनी जामीन मागितला

अचानक अन् चुकून अपघात घडल्याचा दावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या धौला कुआंमध्ये झालेल्या कार दुर्घटनेनंतर एका परिवाराचा पूर्ण आनंदच हरपला आहे. तर दुसरीकडे आरोपी गगनप्रीतचा परिवार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. नवजोत सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सातत्याने रडत असून पत्नीची स्थिती गंभीर आहे. तर दुर्घटनेवेळी बीएमडब्ल्यू कार चालविणाऱ्या गगनप्रीतने स्वत:ला निर्दोष ठरविले आहे. ही दुर्घटना अचानक आणि चुकून घडल्याचा दावा करत तिने जामिनाची मागणी केली आहे. गगनप्रीत कौर सध्या दोन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

गगनप्रीत या दोन अल्पवयीन मुलींची आई असून त्यांची कुठलीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, या दुर्घटनेत त्या देखील जखमी झाल्या आहेत. कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचा दावा गगनप्रीत यांच्या वकिलाने केला आहे. कौर यांनी चौकशीत पूर्ण सहकार्य केले असून त्या पळून जाणार नाहीत तसेच पुराव्यांशी छेडछाड करणार नसल्याचा युक्तिवाद वकिलाने केला.

Comments are closed.