फोटो फाडला; शहा सेनेच्या टोळक्याकडून बाळासाहेबांचा अपमान! महाराष्ट्रात संतापाची लाट… ठिकठिकाणी आंदोलन, तीव्र निषेध
कोट्यवधी शिवसैनिकांचे दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शहा सेनेच्या टोळक्याने आज घोर अपमान केला. शिंदे गटाच्या शायना एनसी यांनी भर पत्रकार परिषदेत शिवसेनाप्रमुखांचा पह्टो फाडला. गद्दार गटाने शिवसेनाप्रमुखांचा अपमान केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांबरोबर शिवसेनाप्रेमी मराठी जनता रस्त्यावर उतरली. ठिकठिकाणी उग्र आंदोलने करून शिंदे गटाचा तीव्र निषेध करण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकमध्ये हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी रोष व्यक्त करत मिंध्यांच्या फोटो जोड्याने हाणले, काळे फासले, शेण फेकले. मुंबई पालिका सभागृहातही यावरून रणपंदन झाले. शिवसेनेने बाळासाहेबांच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करत सभागृहात चर्चेची मागणी केली, मात्र महापौरांनी मागणी अमान्य केल्याने शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले. निषेध करत, शिंदे गटाच्या विरोधात घोषणा देत शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंगः अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. यात त्यांनी स्वतःचे व्यक्तिगत आयुष्य शब्दबद्ध करताना इतरही अनुभव सांगितले आहेत. यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या मजकुराला आक्षेप घेत शिंदे गटाच्या टोळक्याने आज या पुस्तकाची काही पाने फाडली. या टोळक्यात संजय निरुपम, संजना घाडी, आनंद दुबे, शीतल म्हात्रे, शायना एन. सी., सुशीबेन शहा यांचा समावेश होता. पाने फाडण्याची नौटंकी करताना शायना एन. सी. यांनी निर्लज्जपणे हसत हसत बाळासाहेबांचा फोही फाडून टाकला. त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. मुंबईपासून दिल्लीपर्यंत विविध पक्षाच्या नेत्यांनी शिंदे गटाला घेरले. सोशल मीडियातही नाराजी व्यक्त झाली. अशा लोकांना चाबकाने फोडून काढले पाहिजे, अशी संतप्त भावना नेटकऱयांनी व्यक्त केली.
काँग्रेसनेही केला निषेध
शिंदेंच्या नेत्यांनी अनवधानाने नाही, जाणीवपूर्वक बाळासाहेबांचा पह्टो फाडला आहे. हीच भाजप व आरएसएसची विषवल्ली बाळासाहेबांचे बोट पकडून सत्तेवर आली आणि संधी मिळताच त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली. गद्दार सेनेचा निषेध असो, अशी एक्स पोस्ट करत काँग्रेस प्रवत्ते अतुल लोंढे यांनी निशाणा साधला.
जिथे दिसतील तिथे यांना ठोका!
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वरून गद्दारांवर हल्ला चढवला. ‘अमित शहा यांच्या शिंदे सेनेचे लोक शिवसेनाप्रमुखांचा फोटो फाडत आहेत. कारण हे सगळे भाडोत्री आहेत. यांच्याकडे ना कोणता विचार आहे, ना नैतिकता. ना एक नेता आहे, ना निष्ठा. हे काळतोंडे आणि पांढऱ्या पायाचे लोक शिवसेनेतून पळून गेले ते बरेच झाले, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. ‘बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या या सगळय़ांच्या ढुंगणावर चाबकाचे फटके मारले पाहिजेत. जिथे दिसतील तिथे यांना ठोका, असे आवाहन त्यांनी केले. ‘ही असली अवलाद घेऊन तुम्ही बाळासाहेबांचा विचार वाढवताय का,’ असा सवालही त्यांनी शिंदे यांना केला.
शिंदेंचा फोटो नदीत बुडवला
पुण्यात संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि शायना एनसीचे पोस्टर फाडून थेट मुठा नदीत विसर्जित केले. तसेच रास्ता रोको करत शिवसैनिकांनी तीव्र निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली.
हा गुन्हाच, तत्काळ कारवाई करा
बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राने राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला आहे. त्यांच्या प्रतिमेची किंवा फोटोची अशी जाणीवपूर्वक विटंबना करणे हे केवळ एका महान व्यक्तीविरुद्धचे कृत्य नसून समाजातील भावनांना ठेच पोहोचवणारे, सार्वजनिक शांतता भंग करणारे आणि दोन गटांत तेढ निर्माण करणारे गंभीर कृत्य आहे. ही घटना केवळ राजकीय प्रतिस्पर्धा नाही, तर कायद्याची अवहेलना आहे. यासाठी भारतीय न्याय संहितेत वेगवेगळय़ा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करावी. गृहमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात तरी कर्तव्यभावना दाखवावी, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेनाप्रमुखांचा अपमान करणारे सहा गुन्हेगार
शायना एनसी, संजय निरुपम, आनंद दुबे, शीतल म्हात्रे, सुशीबेन शहा, संजना घाडी
Comments are closed.