Ballot Paper Voting mla uttamrao jankar will resign from mla demand
सोलापूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. यावेळी महाविकास आघाडीला अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला. पण ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. हे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बॅलेट पेपरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर 23 जानेवारीला आपला राजीनामा सादर करणार आहेत. तसेच, माळशिरस येथील पोटनिवडणूक तातडीने जाहीर करावी, ही निवडणूक बॅलेट पेपरवर किंवा व्हीव्हीपॅट दिसेल अशा पद्धतीने घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Ballot Paper Voting mla uttamrao jankar will resign from mla demand)
हेही वाचा : Sarangi Mahajan: धनंजयलाही आत घाला, त्याला सरकारी जेवण जेऊ द्या; कुटुंबातील महिलेने केली धक्कादायक मागणी
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार उत्तम जानकर म्हणाले की, “23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयोगाला मारकडवाडी आणि धानोरे या दोन गावातील लोकांची प्रतिज्ञापत्र सादर केली जाणार आहेत. याच दिवशी जर मुख्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर न केल्यास माजी आमदार बच्चू कडू आणि मी जंतर मंतर येथे आंदोलन करणार आहेत.” त्यामुळे आता माळशिरसमधील बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा मुद्दा आता दिल्लीतील जंतर मंतरवर गाजणार आहे. आमदार उत्तम जानकर यांनी पदाचा राजीनामा देऊन माळशिरसमध्ये पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी आणि धानोरे गावातील मतदारांनी ग्रामसभा घेऊन स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार केली आहेत. या दोन्ही गावातील मतदारांचे प्रतिज्ञापत्र मुख्य निवडणूक आयुक्तांना सादर केले जाणार आहेत. त्यात त्यांनी पुन्हा मॉक पोलसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. नुकतेच धानोरेमधील मतदारांनी हात वर करून मतदान केले आहे. त्यात 1206 मतदारांनी हात वर केले होते. पण विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष 963 मते मिळाली होती. जर मॉक पोलसाठी परवानगी मिळणार नसेल तर आमदार उत्तम जानकर हे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या अटीवर आमदारकीचा राजीनामा मुख्य निवडणूक आयुक्त यांना देणार आहेत. जर मागणी मान्य नाही झाली तर 23 जानेवारीपासून दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरू करण्याचा इशारा आमदार जानकर यांनी दिला आहे.
Comments are closed.