पाकिस्तानला धक्का, बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र देश केले जाहीर; राष्ट्रगीत, चलन आणि ध्वज बनवल्याचा दावा
स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱया बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. बलुचिस्तानने पाकिस्तानपासून वेगळे होत स्वतःला स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले आहे. या घोषणेचे एक निवेदन जारी करण्यात आले असून वेगळे राष्ट्रगीत, ध्वज आणि राष्ट्रीय चलन तयार केल्याचाही दावा या निवेदनात करण्यात आला आहे.
द रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान अशा मथळ्याने हे निवेदन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की बलुचिस्तानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून, आम्ही आता येथील सोने आणि कॉपरच्या खाणीवर नियंत्रण मिळवले असून, आमच्याकडे 150 सुरू असणाऱया गॅसचे क्षेत्र आणि 1,200 कोळसा खाणींवर बलुचिस्तानचे नियंत्रण असेल, असे या निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानला हाकलून लावणार
85 टक्के भूभागावर आमचे नियंत्रण आहे. 2026 च्या अखेरपर्यंत पाकिस्तानला या भूभागावरून हाकलून देण्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तानच्या लष्करात असणारे बुलिचिस्तानचे नागरिक आता राजीनामे द्यायला लागले आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.
Comments are closed.