आरवलीत नवीन खाणकामावर बंदी
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : एमपीएसएम तयार करा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अरावलीची पर्वतरांग आणि वनक्षेत्राला वाचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निर्णय दिला. अरावलीत नव्याने मायनिंगसाठी भूमीपट्टे देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. परंतु वर्तमान मायनिंग पट्टे सुरू राहणार आहेत. न्यायालयाने 4 राज्यांमध्ये फैलावलेल्या पूर्ण रेंजमध्ये शाश्वत मायनिंगकरता केंद्र सरकारला एक व्यवस्थापन योजना तयार करण्यास सांगितले आहे. अरावली रेंज गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत फैलावलेले आहे.
याप्रकरणी सरन्यायाधीश गवई, न्यायाधीश विनोद चंद्रन आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने सुनावणी केली आहे. अरावली पर्वतरांग आणि रेंजसंबंधी तज्ञांच्या समितीने मांडलेली व्याख्या खंडपीठाने मान्य केली आहे. सुनावणीदरम्यान काही सूट वगळता कोर/इनवॉयेलट एरियात मायनिंगवर बंदी घातली आहे. समितीने आवश्यक, रणनीतिक आणि एटॉमिक मिनरल मिळविण्याच्या व्यतिरिक्त कोर/इनवॉयलेट एरियात मायनिंगवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. अरावलीच्या पर्वतरांगेत अवैध मायनिंग रोखण्याच्या सूचना मान्य करत खंडपीठाने पर्यावरण आणि वन विभागाला पूर्ण रेंजसाठी एमपीएसएम तयार करण्याचा निर्देश दिला. हे काम इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशनद्वारे करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.
योजनेवर शिक्कामोर्तब होईपर्यंत अनुमती नको
जोपर्यंत मंत्रालय आणि आयसीएफआरईद्वारे मॅनेजमेंट प्लॅन फॉर सस्टेनेबिलिटी मायनिंग (एमपीएसएम)वर शिक्कामोर्तब होत नाही तोवर कुठलाही मानयिंग पट्टा वितरित केला जाऊ नये. एमपीएसएम तयार झाल्यावर आणि शाश्वत मायनिंगला अनुमती देता येणाऱ्या अरावलीतील भागांची ओळख पटल्यावरच मायनिंग पट्ट्याच्या वितरणासंबंधी सरकारने विचार करावा असे खंडपीठाने म्हटले आहे.
खंडपीठाकडून सरकारला निर्देश
-खाणकामासाठी स्वीकारार्ह क्षेत्रांची ओळख पटवावी.
-पारिस्थितिक स्वरुपात संवेदनशील क्षेत्रांची ओळख पटवा.
-संरक्षणासाठी प्राथमिकतायुक्त क्षेत्रांची पाहणी करा.
-योजनेत पर्यावरणावरील प्रभावही सामील करावा.
-मायनिंगनंतर रेस्टोरेटेशन आणि रिहॅबिलिटेशनच्या उपाययोजना असाव्यात.
अरवली पर्वतराजीचा दाब
अरावली पवंतरांग अनेक कारणांमुळे दबावाला सामोरी जातेय. जंगलतोड, अवैध अन् अत्यंत अधिक मायनिंग, शहरी अतिक्रमणामुळे पर्यावरणीय व्यवस्थेला अत्यंत अधिक नुकसान पोहोचत आहे. अरावलीच्या पर्वतरांगेत मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. यात 22 अभयारण्ये, 4 व्याघ्र प्रकल्प, केवालदेव नॅशनल पार्क, सुल्तानपूर, सांभार, सिलिसेढ आणि असोला भाटी यासारखी वेटलँड्स आणि चंबल, साबरमती, लूनी, माही, बनास यासारख्या नदी व्यवस्थेला रिचार्ज करणारे एक्वीफर सामील आहेत.
Comments are closed.