नागिण डान्स करण्याच्या तयारीत असणाऱ्या बांगलादेशची फजीती, षटकार मारूनही फलंदाज बाद

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना 27 ऑक्टोबर रोजी खेळला गेला ज्यामध्ये वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 16 धावांनी पराभव केला. बांगलादेशातील चितगाव येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशला विजय मिळवून देण्यासाठी अखेरच्या षटकांमध्ये चौकार आणि षटाकारंची अपेक्षा होती. गोलंदाज तस्किन अहमदने तसा फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत तसा प्रयत्नही केला आणि त्याने खणखणीत षटकारही खेचला. मात्र, षटकार मारूनही तो बाद झाला आणि बांगलादेशने सामना गमावला.
जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही जिंकलात पण आयुष्य UNO उलट खेचते ◀️#BANvWI pic.twitter.com/neEUjd6bcZ
— फॅनकोड (@FanCode) 27 ऑक्टोबर 2025
बांगलादेशला शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. 19 वे षटक टाकण्याची जबाबदीर वेस्ट इंडिजने रोमारियो शेफर्डच्या खांद्यावर सोपवली. या षटकातील चौथ्या चेंडूवर तस्कीन अहमदने खणखणीत षटकार ठोकला मात्र, याच वेळी त्याचा पाय स्टंपला लागला आणि त्याची ‘हिट विकेट’ पडली. तस्कीन अहमदच्या स्वरुपात बांगलादेशचे सर्व 10 खेळाडू तंबुत परतले आणि वेस्ट इंडिजने 16 धावांनी सामना जिंकला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comments are closed.