अभिनेत्याच्या कॅफेमध्ये अपहार करणारा अटकेत

अभिनेत्याच्या कॅफे शॉपमध्ये 35 लाखांचा अपहार प्रकरणी एकाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. अजय सिंग रावत असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे अभिनेते आहे. त्याच्या वडिलांनी अनेक चित्रपट आणि मालिकेत प्रसिद्ध भूमिका केल्या होत्या. त्याच्या मालकीचे वांद्रे येथे एक कॅफे शॉप आहे. गेल्या तीन वर्षांपासून एक जण तेथे मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याच्यावर संपूर्ण कॅफेची जबाबदारी होती. कॅफेमध्ये येणाऱ्या ग्राहकाकडून येणारे ऑनलाईन आणि कार्डद्वारे पेमेंट बँकेच्या खात्यात जमा होत होते. नुकतेच कॅफेचा माल पुरविणाऱ्या विव्रेत्यांना मालाचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली. त्याच्याकडे वारंवार विचारणा करून तो पेमेंट करत नव्हता.

त्याच्याकडे चौकशी केली. त्याची वागणूक संशयास्पद होती. ऑडिट दरम्यान कॅफेमधील रक्कम 34 लाख रुपये त्याने बँकेत जमा केले नव्हते. त्यामुळे तक्रारदार याने त्याला पह्न करून विचारणा केली. घडल्या प्रकरणी अभिनेत्याने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी अजय सिंगला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले होते.

Comments are closed.