पाकिस्तानच्या पराभवानं टीम इंडियाचं वाटोळं, वर्ल्ड कप 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
महिलांचे विश्वचषक गुण सारणी अद्यतनः निगार सुल्तानाच्या नेतृत्वाखालील बांगलादेश महिला क्रिकेट संघाने गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी आयसीसी महिला विश्वचषक 2025 (ICC Women’s World Cup 2025) मधील पहिला मोठा उलटफेर केला. पाकिस्तानला तब्बल 7 गडी राखून धुळ चारत बांगलादेशने (Bangladesh vs Pakistan) आपला मोहिमेची सुरुवात केली. या विजयासह बांगलादेशने पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याचा फटका मात्र भारताला बसला असून हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्त्वाखालील भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. सध्या गतविजेता ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे. त्यांनी न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवत स्पर्धेला विजयी सुरुवात केली.
आयसीसी महिला विश्वचषक 2025 मधील पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ (Bangladesh beat Pakistan after ICC Women’s World Cup 2025 Points Table)
भारत-श्रीलंका यांच्यात या विश्वचषकमधील पहिलाच सामना खेळवला गेला होता. भारताने तो सामना DLS नुसार 59 धावांनी जिंकला होता आणि सुरुवातीला पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. मात्र नंतर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशने आपापल्या सामन्यात मोठे विजय मिळवत नेट रन रेटच्या आधारे भारताला मागे टाकले. तीनही संघांच्या खात्यात 2-2 गुण आहेत, परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे ऑस्ट्रेलिया व बांगलादेश पहिल्या दोन स्थानी आहेत. सध्या श्रीलंका सहाव्या, पाकिस्तान सातव्या तर न्यूझीलंड शेवटच्या म्हणजे आठव्या स्थानी आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांचा मोहिमेचा पहिला सामना आज खेळला जाणार आहे.
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्यात काय घडलं?
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरणाऱ्या पाकिस्तान संघाने बांगलादेशी गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. पाकिस्तानची संपूर्ण टीम अवघ्या 38.3 षटकांत 129 धावांवर गुंडाळली गेली. एकही पाकिस्तानी फलंदाज 25 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. रमीन शमीमने 23 धावा करत सर्वाधिक धावा केल्या. बांगलादेशच्या शोरना अख्तरने केवळ 3.3 षटकांत 5 धावांत 3 बळी घेतले आणि त्यातील 3 षटके मेडन टाकली.
लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीला बांगलादेश संघाला 7 धावांवर पहिला धक्का बसला, पण नंतर रुबिया हैदर हिने 77 चेंडूत 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कर्णधार निगार सुल्ताना हिने 23 धावा केल्या, तर सोभाना मोस्तारीने नाबाद 24 धावा ठोकत संघाला सहज विजय मिळवून दिला.
भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी महिला विश्वचषक 2025)
महिला विश्वचषकात आता सगळ्यांच्या नजरा भारत–पाकिस्तान सामन्यावर लागलेल्या आहेत. हा सामना रविवार, 5 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.