पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली

ढाका: बांगलादेशनं तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानला 11 धावांनी पराभूत केलं आहे. या विजयासह बांगलादेशनं मालिका 2-1 अशी जिंकली आहे. सलमान आगानं शतक केलं, शाहीन आफ्रिदीनं अखेरपर्यंत संघर्ष केला पण पाकिस्तानचा पराभव झाला. ढाकामध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 290 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा संघ 279 धावांपर्यंत पोहोचू शकला.

बांगलादेशनं वनडे क्रिकेटच्या इतिहासात सातव्यांदा पाकिस्तानला पराभूत केलं आहे. तंजीद हसनच्या 107 धावांच्या जोरावर बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 290 धावा केल्या होत्या. तंजीद हसनचं हे पहिलं शतक आहे.

सलमान आगाचनने शतक झळकावले

291 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्ताननं 17 धावांवर 3 विकेट गमावल्या. एका बाजूनं विकेट जात होत्या. साहिबजादा फरहान आणि मोहम्मद रिझवान देखील फ्लॉप झाले. यामुळं पाकिस्तानची अवस्था 5 बाद 82 झली होती.

या दरम्यान सलमान आगा आणि साद मसूद यांनी  79 धावांची भागीदारी केली आणि डाव सावरला. सलमान आगानं त्यानंतर फहीम अशरफ सोबत 48 धावांची आणि शाहीन आफ्रिदीसोबत 52 धावांची भागिदारी केली. पाकिस्तानच्या विजयाची शक्यता वाढलेली असतानाच 48 व्या ओव्हरमध्ये सलमान आगा 106 धावांवर बाद झाला.

2 ओव्हरमध्ये  28 धावांची गरज

पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदी चांगल्या फॉर्ममध्ये होता.शाहीन आफ्रिदीनं 3 बॉलमध्ये 2 षटकार मारले. यानंतर मुस्तफिजूर रहमान यानं दमदार गोलंदाची केली. शेवटच्या बॉलवर हॅरिस राऊफ बाद झाला.  रिशाद हुसेन यानं दमदार कामगिरी केली. अखेरच्या ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदी फटके मारु शकला नाही.

दरम्यान, बांगलादेशनं पहिल्या वनडेत विजय मिळवला होता.  तर, दुसऱ्या वनडेत पाकिस्ताननं विजय मिळवला होता. तिसऱ्या वनडेत बांगलादेशनं विजय मिळवत मालिका जिंकली आहे. दुसऱ्या वनडेत सलमान आगा ज्या पद्धतीनं धावबाद झाला होता. त्याची क्रिकेट विश्वात मोठी चर्चा झाली होती. मात्र, बांगलादेश सारख्या संघाविरुद्ध मालिका गमावण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढावली आहे. यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंची काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.