बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या बातम्या म्हणजे फेक न्यूज; मोहम्मद युनूस बरळले

बांगलदेशचे काळजीवाहू पंतप्रधान आणि मुखअय सल्लागार मोहम्मद युनूस यांनी काही दिवसांपूर्वीच हिंदुस्थानविरोधात गरळ ओकली होती. तसेच चीन आणि बागंलादेशने मिळून हिंदुस्थानची कोंडी करावी. चीनने हिंदुस्थानचा चिकन नेकचा भाग ताब्यात घ्यावा, अशा प्रकारची वक्तव्ये त्यांनी केली होती. मात्र, हिंदुस्थानमुळेच बांगलादेशची निर्मिती झाली, याचा त्यांना विसर पडला आहे. आता युनूस पुन्हा बरळले असून बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या बातम्या म्हणजे फेक न्यूज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस म्हणाले की ,त्यांच्या देशातील हिंदूंवरील हल्ल्यांचे वृत्त खोटे आहे आणि त्यासाठी हिंदुस्थानच जबाबदार आहे. त्यांनी स्थानिक संघर्षांना धर्माशी जोडण्यास नकार दिला आणि अमेरिकेचे अहवाल आणि ट्रम्प यांच्या टिप्पण्या देखील नाकारल्या. अमेरिकन पत्रकार मेहदी हसन यांच्याशी झालेल्या संभाषणात युनूस म्हणाले, हिंदुस्थानने अशा खोट्या बातम्यांचा महापूर पसरवला आहे, असेही ते म्हणाले.
बांगलादेशात हिंदूंविरुद्ध कोणताही मोठा हिंसाचार होत नाही. जमिनीच्या वाटणीवरून आणि इतर स्थानिक मुद्द्यांवरून शेजाऱ्यांमधील वाद सामान्य आहेत, परंतु त्यांना धार्मिक वळण देऊ नये. शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनानंतर, बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचाराचे अनेक आंतरराष्ट्रीय अहवाल आले होते. युनूस यांनी ते सर्व फेटाळून लावत त्या फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युनूस सरकार यांच्या हिंदूंवरील वागणुकीला “क्रूर” म्हटले होते. युनूस यांनी प्रश्न उपस्थित केला की ट्रम्प यांनी खरोखर असे काही म्हटले होते का आणि त्यांना बांगलादेशात काय घडत आहे याची जाणीव होती का. बांगलादेशात होणाऱ्या हिंसाचाराविरोधात हिंदू समुदायाचे लोकं रस्त्यावर उतरले. सुमारे ३०,००० हिंदूंनी ढाक्याच्या रस्त्यांवरून मोर्चा काढला. त्यांनी युनूस सरकारकडे संरक्षणाची मागणी केली. हिंदू नेत्यांवरील देशद्रोहाचे खटले मागे घेण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, युनूस यांनी हे सर्व फेटाळून लावले आहे.
Comments are closed.