बांगलादेशात पुन्हा हिंसाचार; शेख हसीना यांच्या बालेकिल्ल्यात 4 ठार

शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर शांत असलेल्या बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला असून 15हून अधिक जखमी झाले आहेत.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा बालेकिल्ला असलेल्या गोपालगंजमध्ये बुधवारी अवामी लीग व बांगलादेशच्या सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. बांगलादेशातील नॅशनल सिटीजन पक्षाने या भागात रॅली काढली होती. त्या वेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्ते भिडले. त्यात सुरक्षा दलांनी हस्तक्षेप केला. हसीना यांनी हे मोहम्मद युनूस सरकार पुरस्पृत हत्याकांड असल्याचा आरोप केला आहे. शेख हसीना सध्या हिंदुस्थानात आश्रयास आहेत.

Comments are closed.