बांगलादेश वर्ल्डकपमधून जाणार बाहेर, पाकिस्तानी खेळाडूने भारताविरोधात गरळ ओकली, BCCI चं वर्चस्व
पाकिस्तान T20 विश्वचषकावर बहिष्कार: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टी20 वर्ल्ड कप 2026 संदर्भात बांगलादेशची वेन्यू बदलण्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर आयसीसीच्या निर्णयाविरोधात बांगलादेशने डिस्प्यूट रिझोल्यूशन कमिटी कडे धाव घेत हस्तक्षेपाची मागणी केली. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, DRC ने बांगलादेशच्या अपीलवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ याने खळबळजनक वक्तव्य करत पाकिस्ताननेही टी-20 वर्ल्ड कप 2026 चा बहिष्कार घालावा, अशी मागणी केली आहे.
टी-20 वर्ल्डकपचा बहिष्कार करावा…
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना राशिद लतीफ म्हणाला की, पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनार्थ उभं राहत टी-20 वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घ्यावा. तो म्हणाला, “जर भारत-पाकिस्तान सामना झाला नाही तर अर्धा विश्वचषक आधीच अपयशी ठरेल. क्रिकेटच्या सध्याच्या स्थितीला आव्हान देण्याची ही एक उत्तम संधी आहे.”
लतीफ पुढे म्हणाला, “पाकिस्तानने उघडपणे बांगलादेशला पाठिंबा देत टी-20 वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा ठाम निर्णय घ्यायला हवा. असे मोठे निर्णय घेण्यासाठी ठाम इच्छाशक्ती लागते.”
चॅम्पियन्स ट्रॉफीचा जुना वाद
इथे आठवण करून द्यावी लागेल की, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान संघाने भारतात येण्यास नकार दिला होता. अनेक आठवड्यांच्या चर्चेनंतर आयसीसीने निर्णय घेतला आणि भारत–पाकिस्तान सामने न्यूट्रल वेन्यूवर खेळवण्याचा आदेश दिला.
बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, DRC ने अपील फेटाळल्याने बांगलादेशची शेवटची आशाही संपली आहे. आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, आयसीसी शनिवारी टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला सहभागी होण्याची घोषणा करू शकते.
दरम्यान, आयसीसीने स्पष्ट केले होते की, भारतात बांगलादेशी खेळाडूंना कोणताही धोका नाही. यावर प्रतिक्रिया देताना राशिद लतीफ म्हणाला, “जगातील कोणतीही संस्था पूर्ण सुरक्षेची हमी देऊ शकत नाही. कारण जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीही 100 टक्के सुरक्षिततेची हमी देणे अशक्य आहे.”
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.