ईशान्य हिंदुस्थानला बांगलादेशचा भाग दाखवले, युनूस यांनी पुन्हा डिवचले

बांगलादेशातील हंगामी सरकारचे सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पुन्हा हिंदुस्थानला डिवचले आहे. युनूस यांनी पाकिस्तानी लष्करातील जनरल साहीर शमशाद मिर्झा यांना एक पुस्तक भेट दिले असून त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील नकाशावर हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यांना बांगलादेशचा भाग दाखवण्यात आले आहे. त्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे.

Comments are closed.