बांगलादेश तुर्की ड्रोनसह भारताचे परीक्षण करीत आहे

पाकिस्तानसोबतच्या संबंधांमुळे वाढली चिंता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बांगलादेश स्वत:चा जुना शत्रू पाकिस्तानच्या गोटात शिरू लागल्याने भारताची चिंता वाढू लागली आहे. बांगलादेश आता भारताच्या संवेदनशील भागांनजीक टेहळणीसाठी तुर्कियेकडून निर्मित टीबी-2 ड्रोनचा वापर करत आहे. बांगलादेशच्या या कृतीवर भारताची करडी नजर आहे. भारताच्या यंत्रणांना संवेदनशील भागांनजीक तुर्कियेकडून निर्मित ड्रोन दिसून आला आहे.

मागील काही महिन्यांपासून ड्रोन या भागात घिरट्या घालत आहे. तसेच हा ड्रोन बांगलादेशच्या हवाईक्षेत्रात परंतु भारताच्या सीमेनजीक उ•ाण करत आहे. भारतोन या भागांमध्ये बांगलादेशच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी रडार  तैनात करण्यासोबत सर्व उपाययोजना केल्या आहेत. बांगलादेशी सैन्याचा टीबी-2 ड्रोन अनेकदा 20 तासांहून अधिक काळापर्यंत संबंधित भागातच घिरट्या घालत राहिल्याचे आढळून आले आहे.

टीबी-2 ड्रोन मध्यम उंची आणि अधिक क्षमता असलेला ड्रोन असून तो तुर्कियेच्या संरक्षण उद्योगाच्या सर्वात मोठ्या यशस्वी कामगिरीपैकी एक मानला जातो. हा ड्रोन आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांना वाहून नेण्यास सक्षम आहे. अनेक ठिकाणच्या युद्धांमध्ये या ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचे अंतरिम सरकार पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे मानले जाते. ऑगस्ट महिन्यात शेख हसीना यांना देश सोडावा लागल्यावर मोहम्मद युनूस यांनी  अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली होती आणि तेव्हापासूनच पाकिस्तानसोबतच्या संबंधांना मजबूत करण्याचे सत्र त्यांनी आरंभिले आहे. दोन्ही देशांदरम्यान आता व्यापारही सुरू झाला आहे. अलिकडेच भारतीय सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय भूभागांनजीक बांगलादेशात पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर अधिकाऱ्यांच्या अस्तित्वावर चिंता व्यक्त केली होती.

Comments are closed.