बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाला जिवंत जाळले

बांगलादेशात आणखी एका हिंदू नागरिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नरसिंगदी जिह्यात चंचलचंद्र भौमिक नावाच्या 23 वर्षीय हिंदू तरुणाला जिवंत जाळून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. चंचल चंद्र भौमिक याचा जळालेला मृतदेह एका दुकानात सापडला. गेल्या 40 दिवसांमध्ये बांगलादेशमध्ये 10 हिंदूंची हत्या करण्यात आली आहे.

Comments are closed.