बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, जमावाकडून बेदम मारहाण

बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले वाढत चालले असून आणखी एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे. जमावाने एका हिंदू तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे.
अमृत मंडल उर्फ सम्राट असे मृत तरुणाचे नाव आहे. बांगलादेशातील राजबारीच्या पांग्शा परिसरात झालेल्या हत्येबाबत पोलिसांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, खंडणी गोळा करण्याच्या आरोपावरून जमावाने मारहाण करून तरुणाची हत्या केली आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की, बुधवारी 24 डिसेंबर रोजी गावकऱ्यांच्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला. तो पांगवण्यासाठी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचावे लागले. पोलिसांनी सम्राटचा सहकारी मोहम्मद सलीम याला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्याकडून पिस्तूलसह शस्त्रे जप्त केली आहेत. अमृत मंडलने सम्राट वाहिनी नावाची संघटना स्थापन केली होती आणि आजूबाजूच्या भागातून तो खंडणी वसूल करायचा. अवामी लीग सरकारच्या काळात तो हिंदुस्थानात पळून गेला होता. तो अलीकडेच बांगलादेशला परतला होता, असा त्याच्यावर आरोप आहे.

Comments are closed.