भारताविरुद्ध खेळण्यास आतुर बांग्लादेश! ‘या’ देशाला दिला नकार

बांग्लादेश क्रिकेट बोर्डने सप्टेंबर २०२६ मध्ये होणारा त्यांचा आयर्लंड दौरा पुढे ढकलला आहे. या काळात त्यांना भारताविरुद्ध टी२० आणि वनडे मालिकेचे यजमानपद भुषवायचे आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील तीन वनडे आणि टी२० सामन्यांची मालिका २०२५ मध्येच खेळवले जाण्याचे नियोजन होते, मात्र दोन्ही देशांमधील राजकिय तणावामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता ही मालिका २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, बांग्लादेशने आयर्लंड क्रिकेटला या बदलाबाबत आधीच माहिती दिली आहे. तसेच त्यांनी पुन्हा मालिका आयोजित कण्याची विनंतीही केली होती, मात्र आयर्लंडने ती नाकारली आणि आता बांग्लादेशचा आयर्लंड दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
संगीत स्केलची पाचवी नोंद
र्वनियोजित वेळापत्रकानुसार भारताचा बांग्लादेश दौरा २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, वनडे सामने १, ३ आणि ६ सप्टेंबरला खेळले जातील टी२० सामने ९, १२ आणि १३ सप्टेंबरला खेळले जातील.
बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर नुकतीच वनडे मालिका २-१ अशी जिंकली आहे. त्यामुळे ते आयसीसीच्या वनडे क्रमवारीत नवव्या स्थानावर पोहोचले आहेत. तसेच त्यांचे रेटींग पॉइंट्स ७९ झाले असून ते दहाव्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजपेक्षा दोनने अधिक आहे.
भारताविरुद्धची वनडे मालिका बांग्लादेशसाठी महत्वाची आहे. या मालिकेच्या परिणामानंतर बांग्लादेश २०२७ च्या आयसीसी वनडे विश्वचषकास थेट पात्र होणार की नाही हे कळेल. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे खेळवली जाणार आहे. यासाठी बांग्लादेशला ३१ मार्च २०२७ पर्यंत आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या आठ संघांमध्ये असणे आवश्यक आहे.
Comments are closed.