मुंबईत बांगलादेशी जन्म दाखला घोटाळा, चार वर्षांत 237 बोगस प्रमाणपत्रे देण्यात आले; महापौर रितू तावडे यांची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या संगनमताने बांगलादेशी, रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये गेल्या चार वर्षांत तब्बल 237 बोगस प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. खुद्द महापौर रितू तावडे यांनीच आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बांगलादेशींना बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिल्या प्रकरणात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून 8 जणांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आल्याचेही यावेळी महापौरांनी स्पष्ट केले. आगामी काळात बांगलादेशी, रोहिंगे यांचा शोध घेण्यासाठी फेरीवाल्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.