भारत-बांगलादेश सीमेवर तणापूर्ण वातावरण, दोन्हीकडील शेतकरी सीमेवरच भिडले, नेमकं प्रकरण काय?
भारत बांगलादेश सीमा: भारतीय आणि बांगलादेशच्या सीमेवर दोन्ही देशांच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाला आहे. या वादानंतर भारत आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशी शेतकऱ्यांवर सीमेपलीकडून पीक चोरीचा आरोप केला आहे. त्यामुळं दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरु झाला आहे. दोन्ही देशांतील शेतकऱ्यांची संख्या वाढू लागल्यानं प्रकरण वाढण्याची शक्यता आहे. यावेळी दगडफेक देखील झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
घटनेची माहिती मिळताच बीएसएफ (भारतीय सीमा सुरक्षा दल) आणि बीजीबी (बांगलादेश बॉर्डर गार्ड) तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दोन्ही सुरक्षा दलांनी आपापल्या देशातील शेतकऱ्यांना पांगवले आहे. मालदा सीमेवर भारत आणि बांगलादेशच्या शेतकऱ्यांमध्ये चोरी आणि अतिक्रमणाच्या आरोपावरून जोरदार चकमक झाली आहे. भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशी शेतकऱ्यांवर पीक चोरीचा आरोप केला आहे.
बीएसएफ आणि बीजीबीची भूमिका
बीएसएफने भारतीय शेतकऱ्यांना सीमेवर असे वाद टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा कोणत्याही समस्येबाबत तात्काळ सुरक्षा दलांना कळवावे. दुसरीकडे, बीजीबीनेही बांगलादेशी शेतकऱ्यांना समजावून सांगितले आहे. त्यांच्या भागात कारवाई करून परिस्थिती बिघडण्यापासून रोखण्यात आले आहे. दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, भारतीय शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. कारण बांगलादेशच्या शेतकऱ्यांनी भारतीय शेतकऱ्यांची पिके चोरल्याचा आरोप आहे.
सीमेवर परिस्थिती नियंत्रणात
सर्व भारतीय शेतकऱ्यांना सुखरूप परत बोलावण्यात आले आहे. मात्र, या घटनेनंतर बांगलादेशच्या सीमेच्या 50 ते 75 मीटर आत काही बांगलादेशी नागरिक दिसले होते. त्यानंतर BGB ने त्यांना हटवले आहे. सध्या सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे सामान्य आणि नियंत्रणात आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान सुमारे 4,096 किमी लांबीची सीमा आहे. जी पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरामला लागून आहे. ही जगातील सर्वात लांब आणि जटिल आंतरराष्ट्रीय सीमांपैकी एक आहे. सीमावादामुळे दोन्ही देशातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये अनेकदा तणावाच्या घटना घडतात. मात्र, बीएसएफ आणि बीजीबीच्या युनिट कमांडंटनी सीमेवर शांतता राखण्यासाठी आणि भविष्यात असे वाद टाळण्यासाठी समन्वय बैठक घेण्याचे नियोजन केले आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.