बांगलादेशी नागरिकांना सिलीगुडीतील हॉटेलमध्ये परवानगी नाही.
हिंदूंच्या मॉब लिंचिंगवरून संताप व्यक्त
मंडळे/ सिलिगुडी
सिलिगुडीचे कुठलेही हॉटेल कोणत्याही बांगलादेशी पर्यटकाला वास्तव्य करू देणार नसल्याची घोषणा ग्रेटर सिलिगुडी हॉटेलियर्स वेलफेयर असोसिएशनने केली आहे. याचबरोबर वैद्यकीय व्हिसावर येणाऱ्या बांगलादेशींनाही देखील वास्तव्य करू दिले जाणार नाही. मागील वर्षापासून बांगलादेशात उद्भवलेली स्थिती पाहता आम्ही सिलिगुडीच्या कुठल्याही हॉटेलमध्ये कोणत्याही बांगलादेशी पर्यटकाला वास्तव्याची सुविधा न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे असोसिएशनचे संयुक्त सचिव उज्ज्वल घोष यांनी सांगितले आहे.
बांगलादेशची वर्तमान स्थिती आणि सिलिगुडी कॉरिडॉर तसेच ईशान्य भारतासंबंधी तेथील काही नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्ये पाहता आम्ही विरोध करत आहोत. आतापासून आम्ही वैद्यकीय व्हिसावर येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला वास्तव्याची अनुमती देणार नाही. आमच्यासाठी देश सर्वोपरि असून त्यानंतरच आमचा व्यवसाय येदोत असे घोष यांनी म्हटले आहे.
हॉटेल्सबाहेर नोटीस
सिलिगुडीच्या हॉटेल्सबाहेर बांगलादेशावर बहिष्कार टाकण्याचा मजकूर असलेली पोस्टर्स झळकली आहेत. याचबरोबर काही वाहनचालकांनीही स्वत:च्या वाहनांवर अशाप्रकारची पोस्टर्स चिकटविली आहेत. तसेच बांगलादेशी नागरिकांना परिवहन सेवा पुरविणे बंद केले आहे. बांगलादेशींना भारतात अनेक सुविधा मिळतात,त रीही बांगलादेशात बंगाली आणि हिंदूंच्या विरोधात हिंसा केली जातेय. अशाप्रकारचे कृत्य अस्वीकारार्ह आहे आणि याचमुळे आम्ही बांगलादेशी पर्यटकांना वास्तव्याची सुविधा देण्यास नकार दिल्याचे एका हॉटेलचे व्यवस्थापक दिलीप मल्लिक यांनी सांगितले आहे.
Comments are closed.