बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांचे राष्ट्राला उद्देशून पहिले भाषण
तारिक रहमान यांनी बांगलादेशचे ११ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, राष्ट्राला संबोधले. यावेळी त्यांनी लोकशाही पुनर्संचयित करण्यापासून ते भ्रष्टाचार रोखण्यापर्यंत सरकारच्या विविध प्राधान्यक्रमांची रूपरेषा मांडली. त्यांच्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, देश कोणत्याही पक्षाने, राजकीय प्रभावाने किंवा शक्तीने नव्हे तर कायद्याने चालवला जाईल. बांगलादेशातील सरकारी वाहिनी बीटीव्हीने रात्री ९:४५ वाजता तारिक रहमान यांचे भाषण प्रसारित केले.
पंतप्रधान झाल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये तारिक रहमान म्हणाले, “बीएनपी सरकारचा असा विश्वास आहे की, राजकीय पक्ष, श्रद्धा किंवा धर्माच्या बाबतीत आपली ओळख वेगवेगळी असेल. परंतु असे असले तरी हा देश सर्वांचा आहे. कोणी बीएनपीला मतदान केले असो वा नसो, बांगलादेशच्या नवीन सरकारच्या नजरेत सर्वांना समान अधिकार आहेत.”
तारिक रहमान म्हणाले की, त्यांना देशातील लोकांना हा संदेश द्यायचा होता. मुस्लिम, हिंदू, बौद्ध किंवा ख्रिश्चन, पक्षाशी संलग्नता, धर्म किंवा जात काहीही असो, तुम्ही कुठेही राहात असाल, हा देश सर्वांचा आहे. या देशात आणि या राज्यात बांगलादेशी म्हणून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत. येथे कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय प्रभावाने नव्हे तर कायद्याचे राज्य कायम राहील.
Comments are closed.