Ratnagiri News – बॅंक कर्मचारी संप, रत्नागिरीत बॅंक कर्मचारी तीन दिवस रॅली काढून निदर्शने करणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या वतीने बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी, पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्यासाठी उद्या पासून तीन दिवस संप पुकारण्यात येणार आहे.संपात सहभागी झालेले कर्मचारी तीन दिवस रत्नागिरीत रॅली काढून निदर्शने करणार आहेत.

दिनांक 8 मार्च 2024 रोजी झालेल्या 12व्या द्विपक्षीय वेतन करारामध्ये पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याबाबतची बाब मान्य करण्यात आली होती. तथापि, त्यानंतर सुमारे 30 महिने उलटूनही सदर निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे.

उद्या दि. 28 सप्टेंबर रोजी बॅंक कर्मचारी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते बॅंक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय आरोग्यमंदिर दरम्यान रॅली काढणार आहेत. 29 सप्टेंबर रोजी मारुती मंदिर रत्नागिरी येथून स्टेट बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय आरोग्य मंदिर पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. दि. 30 सप्टेंबर रोजी मारुती मंदिर रत्नागिरी येथून बॅंक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय शिवाजीनगर दरम्यान रॅली काढून निदर्शने करण्यात येणार आहेत.

Comments are closed.