एप्रिल महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी? जाणून घ्या बँका कोणत्या दिवशी बंद राहणार
बँक सुट्टी एप्रिल 2026 : मार्च महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरु आहे. 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरु होणार आहे.एप्रिल महिन्यात बँकाचं कामकाज विविध कारणांमुळं 14 दिवस बंद राहणार आहेत. यामुळं एप्रिल महिन्यात तुम्ही बँकेत काही कामं करणार असाल तर तुम्हाला पहिल्यांदा बँका कधी सुरु आहेत आणि कधी बंद आहेत, याची माहिती असणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या यादीनुसार पुढील महिन्यात रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार याशिवाय काही सणांच्या निमित्तानं बँका जवळपास 14 दिवस बंद राहणार आहे.
आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिलला संपूर्ण देशभर बँका बबंद राहणार आहे. या दिवशी बँक कर्मचारी कार्यलयात असतील. मात्र, ग्राहकांसाठी या दिवशी कामकाज केलं जाणार नाही. हा दिवस बँकांच्या वार्षिक खाते बंद करण्यासाठी राखीव ठेवलेला असतो. या दिवशी चेक क्लिअरिंग आणि काऊंटरवरुन पैसे जमा करण्यासाठी कोणतीही कामं केली जाणार नाहीत.
एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्टीची यादी (Bank Holiday April 2026 Marathi News)
1 एप्रिल : वार्षिक कामकाज क्लोजिंगमुळं बँका देशभर बंद असतील.
2 एप्रिल : पुण्य गुरुवार निमित्त कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
3 एप्रिल : गुड फ्रायडे निमित्त बँका देशभर बंद
5 एप्रिल : रविवार निमित्त सर्व बँका बंद असतील.
11 एप्रिल : दुसरा शनिवार, सर्व बँका बंद
12 एप्रिल : रविवारनिमित्त सर्व बँका बंद
14 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इतर सनांच्या निमित्तानं बँकांना सुट्टी
15 एप्रिल : बंगाली नववर्ष दिवस, यासह इतर सनांमुळं आगरताळा, गुवाहाटी, ईटानगर, कोची, कोलकाता, शिमला, तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
16 एप्रिल : बोहाग बिहू निमित्त गुवाहाटीत बँका बंद
19 एप्रिल : देशातील सर्व बँका रविवार निमित्त बंद असतील.
20 एप्रिल : अक्षय तृतीया आणि बसव जयंतीनिमित्त बंगळुरु आणि इतर ठिकाणी बँका बंद असतील.
21 एप्रिल : गारिया पूजेनिमित्त बँका आगरताळामध्ये बंद असतील.
25 एप्रिल : चौथ्या शनिवारी बँका बंद असतील.
26 एप्रिल : रविवार असल्यानं साप्ताहिक सुट्टी
ऑनलाईन व्यवहार सुरु राहणार
एप्रिल महिन्यात बँका विविध कारणांमुळं बंद राहणार असल्या तरी डिजीटल बँकिंग सेवा सुरु राहील. यूपीआय आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही पैसे पाठवू शकता. किंवा एटीएमच्या माध्यमातून पैसे काढू शकता.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.