सरकारी बँकेत अधिकारी होण्याची मोठी संधी! 541 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

बँक जॉब: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे. तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 541 पदांची भरती केली जाईल. अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? अर्ज करण्याची मुदत किती दिवस आहे? पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 14 जुलै 2025 पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी sbi.co.in ला भेट देऊन किंवा थेट ibpsonline.ibps.in/sbipomay25/ या नोंदणी पोर्टलवर अर्ज करू शकतात.

एकूण रिक्त जागा किती?

या भरतीअंतर्गत एकूण 541 पदे भरली जातील. यापैकी 500 पदे नियमित श्रेणीतील आहेत. 41 पदे मागील भरतींमधील अनुशेष म्हणजेच रिक्त पदे भरण्यासाठी आहेत.

अर्ज करण्यासाठी काय आहे पात्रता?

शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील (एससी, एसटी, ओबीसी) लोकांना नियमांनुसार वयात सूट मिळेल.

अर्ज करण्यासाठी किती शुल्क भरावे लागेल?

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी शुल्क 750  रुपये आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.