सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वर्षभरात 50 हजार जागा भरण्याची शक्यता

नवी दिल्ली : सार्वजनिक बँकांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरी करण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आणि बँकांच्या शाखांच्या विस्तारीकरणासाठी चालू आर्थिक वर्षांमध्ये 50000 कर्मचाऱ्यांची भरती करेल, अशी माहिती आहे. वेगवेगळ्या बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नव्या भरतीमध्ये 21000 पदं अधिकाऱ्यांची असतील तर इतर पदही क्लार्क किंवा इतर असतील. 

सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांपैकी सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक या आर्थिक वर्षामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर्स सह 2000 लोकांची भरती करणार आहे. या प्रक्रियेपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडियानं 505 प्रोफेशनरी ऑफिसर्स तर 13455 ज्युनिअर असोसिएट्स ची भरती केली आहे. 

भारतीय स्टेट बँकेने 13455 ज्युनिअर असोसिएटची भरती देशातील 35 राज्ये आणि केंद्रशासीत  प्रदेशातील रिक्त जागा भरण्यासाठी केली आहे. मार्च 2025 पर्यंत स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या 236226 इतकी होती. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च रोजी बँकेत 115066 अधिकारी आहेत. स्टेट बँकेला एका पूर्णवेळ कर्मचाऱ्याच्या हायरिंगसाठी 40440.59 रुपये खर्च होता. स्टेट बँक ऑफ इंडियातून दर वर्षी दोन टक्के कर्मचारी नोकरी सोडतात. 

पंजाब नॅशनल बँक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक आहे. बँकेनं चालू आर्थिक वर्षात 5500 कर्मचारी वाढीचं ध्येय ठेवलं आहे. मार्च 2025 मध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 102746 इतकी होती. 

सेंट्रल बँक 4000 कर्मचाऱ्यांची भरती करणार?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया चालू आर्थिक वर्षात 4000 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचं नियोजन करत आहे.  वित्त मंत्रालयानं सरकारी बँकांना त्यांचं कार्यक्षेत्र वाढवण्यास सांगितलं आहे. याशिवाय बँकांच्या उपकंपन्यांना शेअर बाजारात लिस्ट करुन चांगला परतावा मिळवण्यास सांगितल्याची माहिती आहे. 

इतर बातम्या :

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/business/gold-rate-increased-1440-rupees-in-Wened-check-रेट-इन-मुंबई-न्यू-डेलही-आणि-इतर-शहर-इन-माराथी -1368308">सोनं पुन्हा महागलं, सात दिवसात सोनं किती रुपयांनी वाढलं? मुंबई नवी दिल्लीसह प्रमुख शहरांमधील दर जाणून घ्या

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/business/donald-trump-america-preare-100-nation-list-for-basleine-10-percent-tariff- इंडिया-जपान-ईयू-बी-इन-लिस्ट -1368297">Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प लवकरच 100 देशांवर 1 ऑगस्टपासून टॅरिफ बॉम्ब टाकणार, टॅरिफ किती टक्के असणार?  भारताला फटका बसणार?

Comments are closed.