बँक ऑफ बडोदात नोकरीची मोठी संधी, 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, काय आहे पात्रता?
बँक ऑफ बडोदा भर्ती 2025 : तुम्हाला जर बँकेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने देशभरातील अनेक व्यावसायिक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण १४६ पदे भरली जातील. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदाने विविध विभागांमध्ये व्यावसायिक पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांमध्ये वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, प्रायव्हेट बँकर आणि पोर्टफोलिओ रिसर्च अॅनालिस्ट यांचा समावेश आहे. देशभरातील विविध शाखांसाठी ही भरती केली जाईल. सर्वात जास्त पदे ही वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजरसाठी राखीव आहेत. यासाठी 101 पदे आहेत. याव्यतिरिक्त, टेरिटरी हेडसाठी 17, वेल्थ स्ट्रॅटेजिस्टसाठी 18, प्रायव्हेट बँकरसाठी 3 आणि इतर पदे देखील खुली आहेत.
या पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं गरजेचं
या पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असले पाहिजेत. काही पदांसाठी, एमबीए पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. बँकिंग किंवा वित्त क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना देखील फायदा होऊ शकतो. दरम्यान, जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी तातडीने अर्ज करावे. कारण नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सर्वात जास्त पदे ही वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजरसाठी राखीव आहेत. यासाठी 101 पदे आहेत. याव्यतिरिक्त, टेरिटरी हेडसाठी 17, वेल्थ स्ट्रॅटेजिस्टसाठी 18, प्रायव्हेट बँकरसाठी 3 आणि इतर पदे देखील खुली आहेत.
किमान वयोमर्यादा 22 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 57 वर्षे
या भरतीमध्ये किमान वयोमर्यादा 22 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 57 वर्षे आहे, तर काही पदांसाठी वयोमर्यादा 35 किंवा 45 वर्षांपर्यंत देखील निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी, सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि ओबीसी उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागतील. अनुसूचित जाती, जमाती, अपंग आणि महिला उमेदवारांसाठी, 100 रुपये शुल्क भरावे लागतील.
कशी असेल निवड प्रक्रिया?
उमेदवारांची निवड अनेक टप्प्यात केली जाईल. प्रथम अर्जांची निवड केली जाईल आणि त्यानंतर मुलाखती घेतल्या जातील. यशस्वी उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर अंतिम निवड केली जाईल. सर्वप्रथम, बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तेथील भरती किंवा करिअर विभागात जा. बँक ऑफ बडोदा भरती 2025 च्या लिंकवर क्लिक करा. स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
आणखी वाचा
Comments are closed.