बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस सुनेत्रा पवारांविरोधात कोणता मोहरा रिंगणात उतरवणार? पाच जणांम

Baramati Byelection 2026 Congress: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. येत्या 23 एप्रिल रोजी बारामती मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी (Baramati Bypoll 2026) मतदान होईल. तर 4 मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ही निवडणूक लढवणार आहेत. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. मात्र, आतापर्यंत 19 उमेदवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्याने बिनविरोधची शक्यता जवळपास मावळली आहे. काँग्रेसने सुरुवातीपासूनच बारामती पोटनिवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. त्यासाठी काँग्रेस (Congress) पक्षाचा उमेदवार सोमवारी आपला उमेदवार अर्ज दाखल करेल. मात्र, काँग्रेस सुनेत्रा पवार यांच्याविरोधात कोणाला रिंगणात उतरवणार, याची उत्सुकता सर्वांना होती. या उमेदवाराचे नाव आता जवळपास निश्चित झाल्यात जमा आहे. (Maharashtra Politics News)

महाविकास आघाडीचा भाग असलेल्या ठाकरे गट आणि शरद पवार गटाने बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. मात्र, काँग्रेस सुरुवातीपासूनच ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून काँग्रेसकडून अर्चना पाटील, आकाश मोरे, वैभव बुरुगंले, रोहीत बनकर, डॉ. विजयकुमार पिसे यांच्या नावांची चर्चा सुरु होती. यापैकी आकाश मोरे (Akash More) यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.  आकाश मोरे यांच्या रुपाने काँग्रेस पक्षाने बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याविरोधात धनगर समाजाचा चेहरा देण्याच्या प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामतीत उमेदवारी अर्ज दाखल करायला जातील. (Baramati Bypoll congress candidate)

Baramati News: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत

सतीश कदम (हिंदुस्थान जनता पार्टी)
सागर भिसे ( अपक्ष )
सागर भिसे ( अपक्ष )
राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी )
गजानन गवळी ( अपक्ष )
त्रिशाला कांबळे ( अपक्ष )
दिलीप अळोणी ( अपक्ष )
दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष )
अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी )
मिथून आटोळे ( अपक्ष, बारामती )
रझाक मुलाणी (अपक्ष)
संदीप खरात ( अपक्ष )
विलास होळकर ( अपक्ष, बारामती )
अभिजीत बिचुकले ( अपक्ष )
अभिजीत बिचुकले ( अपक्ष )
अनिल तुपे ( अपक्ष )
संकेत गावडे ( अपक्ष, बारामती )
दादा थोरात ( अपक्ष, बारामती )
अभिजीत कांबळे ( अपक्ष, बारामती )

आणखी वाचा

‘बारामती’साठी सुनेत्रा पवारांची मातोश्रीवर फोनाफोनी, काँग्रेस सुद्धा मैदानात; दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरेंचं काय ठरलं? अखेर निर्णय समोर!

Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छूक

आणखी वाचा

Comments are closed.