गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली विद्यार्थिनी दहावीत शाळेतून आली पहिली, बारामती तालुक्यात हळहळ

गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून दहावीतील मुलीने आत्महत्या केली होती. मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ही मुलगी शाळेत पहिली आली आहे. बारामती तालुक्यातील या दुर्दैवी घटनेत गावगुंडांमुळे एका हुशार मुलीचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते.
दहावीची परीक्षा दिलेल्या पीडित शाळकरी मुलीने गावगुंडांना कंटाळून आत्महत्या केली होती. एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडले होते. मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली. दहावीच्या निकालानंतर पीडित मुलगी शाळेत पहिली आली. मंगळवारी पीडितेचा निकाल पाहून तिच्या आईने अक्षरशः हंबरडा पह्डला.
15 वर्षीय मयत मुलगी दहावीत शिकत होती. बारामती तालुक्यातील पीडितेच्या गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हे गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी आरोपी पिडितेला देत होता. चारही आरोपी शस्त्र्ा दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपीने 7 एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याने ही मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.