MPL 2025: यंगस्टर्सने मारलेले MPL 2024 चे मैदान, यांच्या बॅटमधून आलेली सर्वाधिक अर्धशतके
MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या नियोजनाने होत असलेली ही स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी खेळली जाईल. एमपीएल 2023 व एमपीएल 2024 यशस्वी ठरल्यानंतर सर्वांना तिसऱ्या हंगामाचे वेध लागले आहेत. त्यापैकी दुसऱ्या हंगामात सर्वाधिक अर्धशतके ठोकणाऱ्या फलंदाजांची यादी आपण पाहूया. (batters who scored most fifties in mpl 2024)
एमपीएलच्या पहिल्या हंगामाप्रमाणेच दुसरा हंगाम देखील पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाच्या अंकित बावणे (Ankeet Bawne) याने आपल्या नावे केला. सलग दुसऱ्या वर्षी त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवत ऑरेंज कॅप जिंकली. त्याने एमपीएल 2024 मध्ये सर्वाधिक 4 अर्धशतके ठोकलेली. अंकितने हंगामात 12 सामने खेळताना 415 धावा केल्या होत्या.
छत्रपती संभाजी किंग्स संघाचा युवा सलामीवीर ओम भोसले (Om Bhosale) या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने आपल्या आकर्षक फलंदाजीने सर्वांचे मन जिंकलेले. ओम याने स्पर्धेत 11 सामने खेळताना 380 धावा काढलेल्या. त्याने अंकित याच्या बरोबरीने हंगामात सर्वाधिक चार अर्धशतके पूर्ण केलेली.
युवा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) याने सलग दुसऱ्या एमपीएल हंगामात छाप पाडलेली. दुसऱ्या हंगामात ईगल नाशिक टायटन्स संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात त्याचे विशेष योगदान होते. त्याने 13 सामन्यात 314 धावा करताना तीन वेळा पन्नाशीची वेस ओलांडली. यामध्ये 97 धावांची सर्वोच्च खेळी त्याने खेळलेली.
रायगड रॉयल्स संघाचा अष्टपैलू सिद्धेश वीर (Siddhesh Veer) या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यशस्वी ठरलेला. त्याच्या फलंदाजीमुळे रायगड संघाने अनेक सामन्यांमध्ये चांगली झुंज दिली व विजय मिळवले. त्याने तीन अर्धशतकांच्या मदतीने 349 धावा जमवल्या होत्या. एमपीएल 2024 मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (98) देखील सिद्धेश याच्याच बॅटमधून आली होती.
एमपीएल 2024 मध्ये नाशिक संघाची साथ सोडून अनुभवी राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा भाग झालेला. आपल्या स्टायलिश फलंदाजीने त्याने संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली. राहुलने 10 सामन्यात 383 धावा करताना 3 अर्धशतके पूर्ण केलेली. मात्र, त्यानंतरही कोल्हापूर संघ प्ले ऑफ्समध्ये पोहोचू शकला नाही.
ईगल नाशिक टायटन्स संघाला एमपीएल 2024 अंतिम फेरीत नेण्यात युवा अथर्व काळे (Atharva Kale) याचे मोलाचे योगदान होते. अथर्व याने आपल्या संघासाठी सर्व 13 सामने खेळले. यादरम्यान त्याने 378 धावा करताना तीन अर्धशतके साजरी केली.
पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, नाशिकचा रणजीत निकम व छत्रपती संभाजी किंग्स संघाचा दिग्विजय पाटील यांना देखील प्रत्येकी दोन अर्धशतके करण्यात यश आले होते.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या स्पर्धेचे आयोजन करत आहे. पुण्यापासून जवळच असलेल्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 4 जून ते 24 जून या 20 दिवसांच्या कालावधीत ही स्पर्धा खेळली जाईल. एमसीए प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील आयोजित करते आहे. या दोन्ही स्पर्धां JioHotstar या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत. तर, Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर घरबसल्या सामने पाहता येतील. एमसीएने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)
Comments are closed.