आशिया कपमध्ये टीम इंडियाची सर्वोत्तम फलंदाजी लाईन-अप कशी दिसेल? गिलमुळे संघरचनेत बदल निश्चित
टीम इंडिया (Team india) टी-20 फॉरमॅटमध्ये आधीपासूनच खूप मजबूत आहे. भारताने 2024 मध्ये झालेला टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) जिंकला होता. त्या वेळी भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात होती. पण त्या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर भारताच्या टी-20 संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) आली आणि भारताची तरुण टीम तयार झाली. तेव्हापासून आजतागायत भारत टी-20 फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
या वेळी आशिया कप (Asia Cup 2025) टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे. भारतीय संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आधीच टीम मजबूत होती, पण आता शुबमन गिलचा (Shubman gill) समावेश झाल्याने आशिया कपमध्ये मोठा धुमाकूळ उडू शकतो. गिलमुळे भारताची फलंदाजी लाईन-अप अजून बळकट झाली आहे.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ओपनिंगसाठी अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल उतरू शकतात. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा टीमला भक्कम सुरुवात देऊ शकतो. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या धावांचा वेग वाढवण्याचं काम करतील. त्यानंतर रिंकू सिंह, जितेश शर्मा आणि अक्षर पटेल हे पॉवर हिटरची भूमिका निभावतील. अशा फलंदाजी लाईन-अपमुळे भारताकडे आठव्या क्रमांकापर्यंत आक्रमक फलंदाजीची ताकद असेल. त्यामुळे आशिया कपमध्ये 20 षटकांच्या खेळात भारत सुरुवातीपासूनच जोरदार फलंदाजी करू शकतो.
शुबमन गिलच्या आगमनामुळे भारताचा टी-20 संघ आणखी आक्रमक झाला आहे. नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत गिल सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. कर्णधार म्हणून गिलने त्या मालिकेत 5 सामन्यांत 750 पेक्षा जास्त धावा केल्या. याआधी आयपीएल 2025 मध्येही त्याने 15 डावांत 650 धावा केल्या होत्या. गिलच्या या आकडेवारीवरून त्याच्या धावांची भूक दिसून येते. आशिया कपमध्येही जर त्याची बॅट जोरदार चालली, तर भारतासाठी गिलचा समावेश अतिशय फायद्याचा ठरू शकतो.
Comments are closed.