करो या मरो! नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानची प्रतिष्ठा पणाला; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मधील 35 व्या सामन्यात 18 फेब्रुवारीला कोलंबोच्या एसएससी क्रिकेट मैदानावर पाकिस्तान आणि नामिबिया (Pakistan vs Namibia) आमनेसामने येणार आहेत. 2021 मधील त्यांच्या शेवटच्या चकमकीत खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी झाली होती, त्यामुळे या सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळेल. पाकिस्तानसाठी हा सामना विजयासाठी महत्त्वाचा आहे, तर दुसरीकडे नामिबियाकडे गमावण्यासारखे काहीही नसल्यामुळे ते निर्धास्तपणे मैदानात उतरतील.

सलामीला सैम अयूब आणि फॉर्मात असलेला साहबजादा फरहान असतील. मधल्या फळीत कर्णधार सलमान अली आगा, बाबर आझम, उस्मान खान, शादाब खान आणि फहीम अशरफ यांच्यावर जबाबदारी असेल. ही फळी अनुभवी असली तरी त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. सलामीवीर लॉरेन स्टीनकॅम्प आणि जॅन फ्रायलिंक यांना पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर सावध राहावे लागेल. कर्णधार गेरहार्ड इरास्मस आणि जॅन निकोल लॉफ्टी-ईटन अनुभवी असले तरी त्यांना धावगती टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

पाकिस्तानचा गोलंदाजी विभाग संतुलित दिसत आहे. शाहीन शाह आफ्रिदी आणि सलमान मिर्झा वेगवान मारा करतील, तर अबरार अहमद आणि उस्मान तारिक हे फिरकीपटू नामिबियाच्या फलंदाजांसाठी अडथळा ठरू शकतात. तर,नामिबियासाठी रुबेन ट्रम्पेलमॅन हा प्रमुख गोलंदाज आहे, मात्र पाकिस्तानच्या तगड्या फलंदाजीला रोखण्यासाठी नामिबियाच्या गोलंदाजांना शिस्तबद्ध मारा करावा लागेल.

दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन:

पाकिस्तान:
सॅम अयुब, साहबजादा फरहान, सलमान अली आगा (कर्ंधर), बाबर आझम, उस्मान खान, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, सलमान मिर्झा, अबरार अहमद, उस्मान तारिक.
नामिबिया:
लोरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मिट, झेन ग्रीन (यष्टीरक्षक), डायलन लीचर, रुबेन ट्रम्पेलमॅन, विलेम मायबर्ग, बर्नार्ड शोल्ट्झ, मॅक्स हेइंगो.

Comments are closed.