विराट-रोहितसह वरिष्ठ खेळाडूंना बीसीसीआयचे कडक आदेश, पालन न केल्यास परिणाम भोगावे लागतील!

सध्या टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहेत. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर सर्वाधिक टीका होत आहे. माजी क्रिकेटपटूंपासून चाहत्यांपर्यंत सर्वजण त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयच्या सूत्रांकडून एक मोठी अपडेट समोर आली. बोर्डानं या वरिष्ठ खेळाडूंना रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खेळण्याचा सल्ला दिला आहे.

23 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेत सर्वांच्या नजरा रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर वरिष्ठ खेळाडूंवर असतील. त्यांना या स्पर्धेत खेळणं अनिवार्य नसलं, तरी बीसीसीआयनं स्पष्ट केलं की देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो.

‘द हिंदू’मधील एका वृत्तानुसार, बीसीसीआयनं खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला आहे. बोर्डाचा असा विश्वास आहे की, खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळून त्यांचं तंत्र सुधारलं पाहिजे. बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, “देशांतर्गत क्रिकेट खेळणं आवश्यक आहे. जरी ते अनिवार्य नसलं तरी, खेळाडूंना संदेश देण्यात आला आहे की निवडकर्ते त्यांच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेतील. जर खेळाडूंनी याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील.”

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे देखील देशांतर्गत क्रिकेटच्या बाजूनं आहेत. गंभीर म्हणाला, “प्रत्येक खेळाडूनं रणजी ट्रॉफीसारख्या स्पर्धा खेळल्या पाहिजेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये सुधारणा होण्यास मदत होतेच, शिवाय संघासाठी मजबूत पर्यायही निर्माण होतात. जर देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व दिलं नाही, तर आपल्या संघाला खेळण्याची संधी मिळणार नाही.”

वरिष्ठ खेळाडू शेवटचे देशांतर्गत क्रिकेट कधी खेळले होते?

रोहित शर्मा – 9 वर्षांपूर्वी
विराट कोहली – 13 वर्षांपूर्वी
शुभमन गिल – 6 वर्षांपूर्वी
केएल राहुल – 9 वर्षांपूर्वी
रिषभ पंत – 6 वर्षांपूर्वी

हेही वाचा –

विराट कोहलीने रायुडूला 2019 विश्वचषकातून जाणूनबुजून वगळले, माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप
तब्बल 8 वर्षांनंतर टीम इंडियात परतणार हा खेळाडू? 6 डावांमध्ये ठोकली आहेत 5 शतकं!
बुमराह कर्णधार बनला तर उपकर्णधार कोण होणार? हे दोन खेळाडू शर्यतीत

Comments are closed.